मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक रामभाऊ गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते संतोष कवडे यांना अटक... पंढरीतील मराठा कार्यकर्ते उतरले रस्त्यावर!

पंढरपूर LIVE 11 आॅगस्ट  2018



मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांना काल रात्री ते लातुरवरून परत येत असताना तुळजापूर -तामलवाडी टोलनाक्यावर पोलिसांनी अटक केली. पंढरपूर मधील सामाजिक कार्यकर्ते संतोष कवडे यांनादेखील पोलिसांनी अटक केलीय. आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून अटकसत्र पोलिसांनी सुरू केले असल्याची चर्चा आहे. परंतु यासंदर्भात पोलिसांकडून कमालीची गोपनीयता बाळगण्यात येत आहे. दरम्यान आज पोलिसांच्या कारवाई विरोधात अनेक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. 

मराठा आरक्षण आंदोलनात एसटी बसेसवर झालेल्या दगडफेक केल्याच्या गुन्ह्यात दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर पंढरपुरात मोठ्या संख्येने मराठा कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवाजी महाराज पुतळ्यासमोर या कार्यकर्त्यांनी ठिय्या मारून मूक आंदोलन सुरू केले आहे.
शुक्रवारी रात्री मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते रामभाऊ गायकवाड आणि संतोष कवडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. एसटी बसेसवर दगड फेकल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक केल्याचे पोलिस सूत्रांकडून समजते. 
या घटनेनंतर पंढरपुरातील मराठा कार्यकर्त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी सागर कवडे यांच्याकडे जाऊन अटकेच्या कारवाईबाबत विचारणा केली असता कवडे यांनी कोणतेही कारण देण्यास नकार दिला. 
मराठा समाजातील वकील पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा करीत आहेत. पोलिसांनी सूडबुद्धीने कारवाई सुरू केल्याचा आरोप करून कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या दिला आहे


  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments