पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात पालक मेळावा उत्साहात

पंढरपूर LIVE 27 आॅगस्ट  2018


   पंढरपुर (प्रमोद बनसोडे) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयात शुक्रवारी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हा पालक मेळावा मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
 सिंहगड महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या पालक मेळाव्याचे उदघाटन प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, विभाग प्रमुख डॉ. रविंद्र व्यवहारे, पालक प्रतिनिधी एन. एम. गायकवाड, प्रा. श्याम कुलकर्णी, डाॅ. स्वानंद कुलकर्णी, डाॅ. राजश्री बाडगे आदी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
 पालक मेळाव्याचे प्रस्थाविक करताना मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग डॉ. रविंद्र व्यवहारे म्हणाले, विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने आयुष्यातील प्रत्येक गोष्टीला सामोरे गेले पाहिजे. पालकांनी हि विद्यार्थ्यांकडे लक्ष दिले पाहिजे. असे मत डाॅ. रविंद्र व्यवहारे यांनी व्यक्त केले.
   या मेळावा यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह, प्रमाणपञ, पुष्प गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. महाविद्यालयात उपस्थिती पालकांना महाविद्यालयातील शिक्षणपद्धती, विद्यार्थ्यांच्या सर्वागिंण विकासासाठी महाविद्यालयातील सेवा-सुविधा यांची माहिती एलसीडी द्वारे डाॅ. स्वानंद कुलकर्णी व प्रा. समिर कटेकर यांनी उपस्थितांना  दिली. पालकांनी विचारलेल्या प्रश्नांना प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी उत्तरे दिली. उपस्थिती पालकांनी मनोगत व्यक्तकरताना आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक  सर्वागीण प्रगती बद्दलसमाधान व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितीयांना अल्पोपहार देण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकशिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतलेया कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन  प्रा. अमित भादुले यांनी केले.




  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments