१३ ऑगस्टला धनगर समाजाचा ' बंद ' नाही , अफवांवर विश्वास ठेवू नये ...धनगर समाजाचे पंढरपूरकरांना निवेदन

पंढरपूर LIVE 12 आॅगस्ट  2018


 पंढरपूर ---  
सध्या सोशल मिडीयावर मोठया प्रमाणावर येत्या सोमवारी १३ ऑगस्टला धनगर समाजाचा बंद असल्याचा मेसेज फिरत आहे. मात्र वास्तवात असा कुठलाही बंद धनगर समाजाकडून पुकारण्यात आलेला नाही. त्यामुळे  नागरीकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. असे आवाहन धनगर समाजाच्या वतीने करण्यात आलेले आहे. 
    वारंवार होणारे पंढरपूर बंद... अथवा त्यासंबधातील अफवा यांच्यामुळे येथे येणा-या भाविकांचे तसेच व्यापारी वर्गाचे देखिल हाल होत आहे. अशामधेच सध्या सोशल मिडीयावर आणि इतरही अनेक ठिकाणहून धनगर समाजाने १३ ऑगस्टरोजी बंद पुकारला असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र सदरची संपूर्णपणे अफवा असून यावर नागरीकांनी विश्वास ठेवू नये. 
धनगर समाज हा आरक्षणासाठी निश्चित आग्रही आहे. कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने देखिल धनगर समाजाची आंदोलने सुरू आहेत. यांचाच भाग म्हणून भविष्यात न्यायालयीन लढाई देखिल होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सध्यातरी पंढरपूर शहर आणि तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने कुठल्याही प्रकारचा बंद पुकारण्यात आलेला नाही. केवळ १४ ऑगस्ट रोजी पंढरपूर येथे धनगर समाजाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. 
   त्यामुळे पंढरपूर शहर आणि तालुक्यातील व्यापारी तसेच नागरीकांनी चुकींच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. असे आवाहन राज्य धनगर आरक्षण कृति समितीचे सदस्य विठठल पाटील , शालिवाहन कोळेकर , माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर , सुभाष मस्के  ,रायप्पा हळणवर , माउली हळणवर , पांडुरंग घंटी , कमलताई तोंडे , डॉ श्रीकांत देवकते , सोमनाथ ढोणे , बाबा लगसकर , संतोष सुळे , संतोष बंडगर , विश्रांतीताई भुसनर , काशिनाथ आबा लवटे , बबन येळे , वैभव आलदर ,  संतोष शिनगिरे आदिंनी केले आहे. 



  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments