विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने अभ्यास केल्यास इच्छित ध्येय साध्य करता येईल - सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे

पंढरपूर LIVE 15 आॅगस्ट  2018


प्रथम वर्ष अभियांत्रिकीतील विद्यार्थ्यांचे स्वेरीत उत्साहात स्वागत
पंढरपूरः ‘विद्यार्थ्यांनी शिक्षकांमार्फत करवून घेतलेला अभ्यास, प्रात्यक्षिक, सराव, आदी शैक्षणिक उपक्रम सांगतील तेवढे मनापासून केल्यास, तसेच स्वेरीने आखलेल्या शैक्षणिक व्यवस्थेवर विश्वास ठेवून प्रामाणिकपणे आपला अभ्यास करताना स्वतःमधील इच्छा शक्तीला जागृत केल्यास व जबाबदारीचे भान ठेवल्यास, आपण आपले इच्छित ध्येय कोणत्याही परिस्थितीत सहज साध्य करु शकतो.’ असे प्रतिपादन स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी केले.
         गोपाळपूर (ता.पंढरपूर) मधील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूटसंचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजिलेल्या प्रथम वर्ष अभियांत्रिकीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ प्रसंगी मार्गदर्शन करताना सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे बोलत होते. प्रारंभी सर्व विद्यार्थी व पालकांचे गुलाब पुष्प देवून स्वागत केले. व्यासपीठावर या प्रसंगी पालक प्रतिनिधी म्हणुन अॅड. धनंजय हजारे तर महिला पालक प्रतिनिधी म्हणून प्राचार्या सौ.जयश्री राजपूत ह्या उपस्थित होत्या. दिपप्रज्वलनानंतर प्रथम वर्ष विभागप्रमूख डॉ.एस.ए.लेंडवे यांनी प्रास्ताविकातून सर्वांचे स्वागत करून अभ्यासाला लागणारा कालावधीप्रॅक्टिस सेशन,रात्र अभ्यासिकाप्रश्नसंच सोडविणेपंढरपूर पॅटर्नअद्यावत सुविधाउपलब्ध साधनेअभ्यासाची पध्दतगरीब व होतकरु विद्यार्थ्यांसाठी असणारी ‘कमवा व शिका’ योजना व आदींची देखील सविस्तर माहिती दिली. सिव्हील विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत पवार यांनी यश मिळविणे हे अवघड नसते. परंतु इच्छाशक्ती अभावी बऱ्याच वेळा सोपी वाटणारी गोष्ट अवघड बनते.’ असे सांगून शिक्षण घेतानाचे अनुभव सांगितले. टाटा कन्सल्टंन्सी सर्विसेसचे अधिकारी एन.सी.गोसावी म्हणाले की, पैकीच्या पैकी गुण मिळविण्याची क्षमता सिद्ध करून दाखविणाऱ्या या महाविद्यालयातील शिक्षण पद्धतीचे खूप कौतुक वाटते. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवितात यातून विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास होतो. विद्यार्थ्यांनी भविष्यात नोकरीवर अवलंबून न राहता व्यवसाय, उद्योगधंदे उभा करावेत.तसेच येथील शिक्षण पद्धत पाहता स्वेरी संस्थेतील विद्यार्थी भविष्यात मोठे उद्योजक होतील याचा विश्वास वाटतो. आपल्या कार्यात काँटिटेटीव्ह व क्वॉलिटेटीव्ह कार्य करताना कामात प्रगल्भता आणावी तसेच प्रत्येक कॅम्पस इंटरव्हीव्हमधून कम्युनिकेशन स्कीलवर अधिक भर दिला जातो म्हणून विद्यार्थ्यांनी कम्युनिकेशन स्कीलला अधिक महत्व द्यावे.’ पालक प्रतिनिधी म्हणून बोलतांना अॅड. धनंजय हजारे म्हणाले की, नोकरीच्या ठिकाणी नेहमी गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांची गरज असते त्या प्रमाणे स्वेरीत तसे उत्तम प्रकारे विद्यार्थी घडत आहेत आणि विद्यार्थ्यांनी देखील केवळ नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हावे.’ महिला पालक प्रतिनिधी म्हणून बोलताना प्राचार्या राजपूत म्हणाल्या, ‘या महाविद्यालयात विद्यार्थांचे उज्वल भविष्य असल्यामुळेच महाविद्यालय प्रवेश संख्या, वार्षिक परीक्षेचा निकाल आणि प्लेसमेंट यामध्ये अव्वलस्थान रहात आहे. अभियांत्रिकी क्षेत्रात करीअर करतानातंत्रज्ञान विषयक प्राथमिक ज्ञान भक्कम करण्यासाठी हा पंढरपूर पॅटर्न अतिशय उपयुक्त आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने कॉलेज प्रशासन अत्यंत काळजी घेतात यामूळे पालकवर्ग निश्चिंत असतात. ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागातर्फे प्रा. यशपाल खेडकर यांनी कंपनीत रुजू झालेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी सादर करून कंपनीसाठी विद्यार्थांना स्वतंत्र असे ट्रेनिंग दिले जाते याबाबत माहिती दिली. पुढे बोलताना सचिव व प्राचार्य डॉ.रोंगे म्हणाले की, ‘स्वेरी शैक्षणिक संस्था पालकांच्या विश्वासावर व विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी उभी असून येथील प्राध्यापक वर्ग अहोरात्र परिश्रम घेत असतात. आदरयुक्त संस्कार व कठोर परिश्रम केल्यामुळेच विद्यार्थी यशस्वी होत आहेत.’असे सांगून आदरयुक्त शिस्त हा करिअरचा पाया असून स्वेरीची संस्कृती असल्याचे आपल्या सविस्तर भाषणातून स्पष्ट केले. यावेळी पालकांनी मनोगतातून महाविद्यालयाच्या उत्कृष्ठ नियोजनाबध्दल समाधान व्यक्त केले. सोलापूर विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीत संस्था प्रतिनिधी म्हणून निवडणूक जिंकल्याबद्धल पालकांच्या वतीने प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सीजीपीए पॅटर्न नुसार १० पैकी १० गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांसह गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी टीसीएस कंपनीचे अधिकारी वर्ग,अभाविपचे हरिदास बिले, स्वेरीचे माजी उपाध्यक्ष व विश्वस्त एन.एस.कागदे, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात. वसतिगृह व्यवस्थापक प्रा. एम.एम.पवार. सर्व अधिष्ठाता,सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग व सोलापूर जिल्ह्यासह विविध जिल्ह्यातून आलेले पालक व प्रवेश घेतलेले विद्यार्थी असे मिळून तब्बल एक हजार जण उपस्थित होते. प्रा. खेडकर व प्रा. अमोल चौंडे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले तर उपप्राचार्य प्रा. एस.एन.कुलकर्णी यांनी आभार मानले.



  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments