हक्कासाठी मेडीकल दुकानदार उतरले रस्त्यावर... पंढरीत औषध विक्रेत्यांचा निषेध मोर्चा...

पंढरपूर LIVE 28 सप्टेंबर  2018



केंद्र सरकारने ऑनलाईन औषध विक्रीस परवानगी देत ई- पोर्टल सुविधा सुरू केल्याने वैद्यकीय औषध विक्रेत्यांमध्ये कमालीचा असंतोष असून या घटनेचा निषेध म्हणून पंढरपूर येथेे शुक्रवारी निषेध मोर्चा काढण्यात आला.
  
अखिल भारतीय औषध विक्री संघटनेने पुकारलेल्या राज्यव्यापी बंद मध्ये पंढरपूर येथील औषध विक्री व्यवसायिक मोठ्या संख्येने  सामील झाले सरकारचा निषेध करीत पंढरपूरच्या तहसील कार्यालयावर हा मोर्चा धडकला.

 काही दिवसांपासून केंद्र सरकारने निर्णय घेतल्या प्रमाणे देशभर ऑनलाईन औषध विक्री आणि ई-पोर्टल सुविधा सुरू करण्यात आली आहे .यामुळे औषध विक्रेत्यांसमोर व्यावसायिक संकट उभे राहिले आहे. ऑनलाइन औषध विक्रीमुळे कोणतेही औषध ऑनलाइन मागवता येत असल्यामुळे औषधांचा दुरुपयोग होण्याची शक्यता आहे .तरुण वर्ग नवीन औषधांचा नशेसाठी वापर करण्याची शक्यता निर्माण झाली आहे .परवानगी धारक औषधविक्रेत्यांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे यामुळे अखिल भारतीय औषध विक्रीता संघटनेने शुक्रवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी देशी बंद पुकारला आहे . या बाबत चे आपले म्हणणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळविले आहे. शुक्रवारी सकाळी 11 वाजता शिवाजी चौकामध्ये मोठ्या संख्येने जमुन त्यांनी निषेध मोर्चा काढला .या मोर्चामध्ये स्वेरी काॅलेज येथील मेडिकलमध्ये शिकणार्या विद्यार्थी व विद्यार्थींनी सामील झाले होते. सरकार विरोधात घोषणा देत पंढरपूरचे तहसीलदार मधुसुदन बर्गे यांच्याकडे आपले निवेदन देऊन आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याची विनंती या निषेध मोर्चा मार्फत करण्यात आली.  

या निषेध मोर्चामध्ये सोलापूर जिल्हा केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष बसवराज मनोरे ,सचिव राजशेखर बारोळे , असोसिएशनचे मार्गदर्शक सतीश सादिगले ,जिल्हा संघटक तालुकाध्यक्ष प्रशांत खलीपे,सचिव महादेव जाधव, दिलीप कारंडे ,चंद्रकांत देशमुख, श्रीरंग राहिरकर, आणि श्रीरंग बागल, यांच्यासह येथील स्वेरी कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते.











  



महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments