पंढरपूर LIVE 27 सप्टेंबर 2018
पंढरपूर शहर व तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा सध्या पुरता बोजवारा उडालेला असून शहरातील व तालुक्यातील अनेक ठिकाणी अवैध धंद्यांमध्ये वाढ झालीय व गुन्हेगारी बोकाळली असल्याची चर्चा सर्वसामान्यांमधून होताना आढळत आहे.
पंढरपूर शहरातील अनेक जबाबदार पोलिस अधिकार्यांच्या बदल्या झाल्या. शहरासाठी अप्पर पोलिस अधिक्षक पदाचा अधिकारी येणार अशी चर्चा रंगवली गेली परंतु असा वरिष्ठ अधिकारी येणारच नाही हे ही सिध्द झाले. नव्याने नियुक्त झालेल्या पोलिस अधिकार्यांच्या कार्यक्षमतेवर पंढरपूरकरांनी विश्वास ठेवावा असे काहिही घडले नाही. याउलट या तालुक्यातील बंद झालेले अवैध धंदे पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरू झाले असल्याची कुणकुण ऐकायला येतीय. अवैध धंदेवाल्यांचे हप्ते वाढवून घेतल्याची चर्चा ही पसरली आहे. शहरातील अपघातांच्या संख्येतही वाढ झालेली आहे.
किमान पंढरपूर तालुक्यातील गुन्हेगारी कमी आहे परंतु शहरातील गुन्हेगारीत वाढ झाली असल्याची भावना सर्वसामान्य पंढरपूरकरांमधून उमटत आहे. शहर पोलीस ठाण्यातील नवनियुक्त पोलिस अधिकारी जाणूनबुजून याकडे कानाडोळा करताहेत की काय? असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पंढरपूर शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्याचं व येथील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मनापासून प्रयत्न केल्याचं सत्कार्य तत्कालीन कर्तव्यदक्ष डीवायएसपी निखील पिंगळे यांनी सुरू केलं होतं; परंतु त्यांच्या बदलीनंतर 'ये रे माझ्या मागल्या! ' अशी दैन्यावस्था येथील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नेमलेल्या सध्याच्या पोलिस अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे निर्माण झाली आहे. अशी भावना सर्वसामान्य पंढरपूरकर व्यक्त करताना आढळून येत आहेत.
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनीच याकडे लक्ष देऊन येथील परिस्थितीचा आढावा घ्यावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकातून वाढत आहे.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
0 Comments