स्वेरीमध्ये ‘मेसा’ तर्फे तंत्रज्ञान मॉडेल्सचे प्रदर्शन

पंढरपूर LIVE 24 सप्टेंबर  2018



पंढरपूर: येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूर संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयामधील मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभागाच्या विद्यार्थ्यांनी विविध तंत्रज्ञानाची आकर्षक अशी मॉडेल प्रदर्शन मेसा तथा मेकॅनिकल इंजिनीरिंग स्टुडंट असोशिएशन कार्यक्रमाद्वारे प्रदर्शनाचे आयोजन केले होते. याचे उदघाटन उपप्राचार्य प्रा. एस. एन. कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात अवजड वाहनांचे विविध पार्टस व सैन्यदलातील रणगडेक्षेपनास्त्रेलढाऊ विमाने यांच्या अत्याधुनिक मॉडेलचे प्रदर्शन भरविले होते. तंत्र मॉडेल्स पहाण्यासाठी तीन दिवस विद्यार्थ्यांनी  प्रचंड गर्दी केली होती. या कार्यक्रमास पंढरपूरसह सोलापूर जिलाह्यातिल विविध शाळा व महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांनी भेट दिली. या भेटीतुन त्यांनी आवश्यक माहिती जाणून घेतली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्यामध्ये अभियांत्रिकी विषयी आणखीन जिज्ञासा निर्माण झाली.
        विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या विविध शाखेची पायाभूत माहिती दिल्यामुळे अभियांत्रिकी क्षेत्रात अजुनही करियर करण्याची संधी असल्याचे विद्यार्थ्यानी स्पष्ट केले. या प्रदर्शनामध्ये संरक्षण विभागातील विविध  रणगाडे व त्यांचे नमुने तसेच वीज निर्माण करणारा हैड्रोलीक पॉवर प्लांट, माजी राष्ट्रपती व दिवंगत शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम त्यांचे सात प्रकारचे मिसाईल, त्यांचे विविध नमुने,  त्यांचा वापर कुठे-कुठे करण्यात आला याची सविस्तर माहिती देणारी पोस्टरचे प्रदर्शन भरविले होते. नवीन तंत्रज्ञानाची माहिती,मोठमोठे जहाजलढाऊ विमानं यांचे मॉडेल्स तयार करून संपूर्ण विभाग मेकॅनिकलमय बनविन्यात आले होते. विविध ठीकाणी रांगोळीरंगबिरंगी फुगे लावण्यात आले होते.
यातुनही मेकॅनिकलचे दर्शन होत होते. या वेळी ‘मेसा’ प्रेसिडेंट राजेंद्र पवार व इतर सहकारी ऋषभ जाधवपृथिवीजित गायकवाडसुदर्शन शिंदे,ओंकार पोरेनागेश रोंगेसावता रणदिवेरोहित आदलिंगेपवन गोडसेअनिकेत चव्हाणनितीन कदमउमेश भक्तेज्योती देशमुखसुप्रीया कोळेकर,सोनाली चव्हाणशुभदा म्हेत्रेआकाश रकटेनितीन टेलेअरबाज तांबोळीपूर्वेश पानगुडवाले यांच्यासह आदि विद्यार्थ्यांनी परीश्रम घेतले. यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या नेतृतृत्वाखाली ,मेकॅनिकल विभाग प्रमुख प्रा. एस. आर. गवळीप्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता डॉ. पी. एस. कचरेप्रशासन अधिष्ठाता डॉ. आर. आर. गिड्डेप्रा. व्ही. डी. जाधव व मेसा समन्वयक प्रा. अविनाश पारखे यांच्या सहकार्यासह इतर प्राध्यापकांच्या उपस्थितीत उत्तम रित्या पार पडले. हे प्रदर्शन दीर्घकाळ स्मरणात राहील.







  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments