स्वेरीत ‘आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन’ संपन्न

पंढरपूर LIVE 29 सप्टेंबर  2018



समाजाचे स्वास्थ्य राखण्यासाठी कायद्याची निर्मिती - अॅड. भारत बहिरट

पंढरपूर- ‘भारतामध्ये रहात असताना सार्वभौम सत्तेने दिलेला आदेश भारतीय नागरिकांना पाळावा लागतो. तो जर नाही पाळला तर कायद्याचा आधार घ्यावा लागतो. जेव्हा कुटुंब व्यवस्था निर्माण झाली तेव्हा कायदा निर्माण झाला. यासाठी केवळ कायदा निर्माण करून उपयोग नाही तर त्याची प्रत्येक नागरिकांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे असते. यासाठी सार्वजनिक माहिती समाजाला माहित असावी आणि खाजगी माहिती ही संमतीशिवाय कोणत्याही नागरिकाला घेता येत नाही. यासाठी कायद्याचे संरक्षण करणे हे देखील प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य असून समाजाचे स्वास्थ्य राखण्यासाठीच कायद्याची निर्मिती झाली आहे.’ असे प्रतिपादन पंढरपूरचे अॅडव्होकेट भारत बहिरट यांनी केले.

         येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूटमधील अभियांत्रिकीच्या ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंटच्या भव्य सेमिनार हॉलमध्ये ‘आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन’निमित्त आयोजिलेल्या कार्यक्रमात अॅड. बहिरट विद्यार्थ्यांना माहिती अधिकार व कायद्याबाबत मार्गदर्शन करत होते. प्रारंभी प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ. पी.एस.कचरे यांनी माहिती अधिकाराची पार्श्वभूमी सांगून ‘ज्यावेळी कोर्ट कचेऱ्यांची कामकाज चालते त्यावेळी आपल्याला संपूर्ण कायदा माहित असावा.’असे सांगून कार्यक्रम आयोजिण्याचा हेतू सांगितला. उपप्राचार्य प्रा. एस.एन.कुलकर्णी म्हणाले की, ‘लोकशाहीमध्ये भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या दृष्टीने शासनाच्या विविध माहितीबाबत पारदर्शकता व उत्तरदायीत्व राखण्यासाठी माहितीचा अधिकार २००५ साली भारतात लागू झाला.’ असे सांगितले. 

पुढे बोलताना अॅड. बहिरट म्हणाले की, ‘समाजाच्या चालीरीती कशा बदलतात, तसा कायदा तयार होत असतो. एकूणच माणसाच्या प्रत्येक कृतीला नियमाने मर्यादा घातल्या आहेत. जर नियमाचे उल्लंघन केले तर तेथून कायद्याची सुरवात होत असते. यासाठी नियम व कायदे माहित असणे आवश्यक आहे.’ असे सांगून कायदा म्हणजे काय? तो कसा चालतो ? याची सविस्तर माहिती अॅड. बहिरट यांनी दिली. यावेळी शुभम सहानी, जान्हवी शेंबडे, अस्मिता जाधव, गीतांजली मदने यांच्यासह अन्य विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना अॅड. बहिरट यांनी उत्तरे दिली. यावेळी प्राध्यापक व अभियांत्रिकीचे विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन सांस्कृतिक कार्यक्रम विभागप्रमुख प्रा. करण पाटील यांनी केले तर आभार विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात यांनी केले. 








  



महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments