हिवताप व डेंगु आजारावर नियंत्रणासाठी पंढरपूर नगरपरिषदेची युद्ध पातळीवर विशेष मोहीम

पंढरपूर LIVE 28 सप्टेंबर  2018






सध्या सर्वत्र डेंगू, स्वाईन फ्लु व हिवताप सारखे आजार बळावत असल्याचे दिसुन येत आहे. याबाबत जिल्हयातील या रोगांची लागण पाहता पालकमंत्री विजयकुमार देशमुख, उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी जिल्ह्यातील सर्व अधिका-यांची संयुक्तीक बैठक आयोजीत केली होती. या बैठकीमध्ये डेंगू, स्वाईन फ्लु व हिवताप या सर्व आजारांवर नियंत्रण राहण्याच्या दृष्टीने नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, सार्व.आरोग्य विभाग यांनी प्रयत्न करावेत अशा सुचना दिल्या होत्या. त्यास अनुसरुन पंढरपूर नगरपरिषदेने डेंगू, स्वाईन फ्लु व हिवताप या रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी युद्ध पातळीवर विशेष मोहिम हाती घेतली असुन पंढरपूर शहरातील नागरिकांना डेंगीताप,हिवताप व किटकजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन नागरी हिवताप योजने मार्फत ३० हंगामी कर्मचाऱ्यामार्फत कंटेनर सर्व्हे, धुर फवारणी, डासोपत्ती स्थानातील डासांच्या आळ्या नष्ट करणे, पाठीवरच्या ८ स्प्रे पंपाद्वारे फवारणी करुन घेण्यात येत आहेत. कंटेनर सर्व्हेक्षणांतर्गंत शहरातील १७ हजार घरे व झोपडपट्टीमधील ५ हजार घरे यांची तपासणी करण्यात आली असुन या सर्व्हेमध्ये ३९७१ दुषीत घरे आढळून आली असून या दुषीत कंटेनर्समध्ये टेमीफॉसचे द्रावण टाकून डासांच्या आळ्या नष्ट करण्यात आल्या आहेत. ऍक्टीव्ह/पॅसिव्ह सर्व्हेक्षणांतर्गत हिवताप विषयक ३६१९ रक्त नमुने घेण्यात आले असून तपासणीत हिवताप रुग्ण निरंक आढळले आहेत. शहरामध्ये ११ ठिकाणी गप्पी मासे पैदास केंद्र तयार केले असुन या पैदास कंद्रामधून पावसाळ्यात वाढणाऱ्या २६२  डासोत्पत्ती स्थानामध्ये गप्पी मासे सोडण्यात आले आहेत. पंढरपूर शहरातील सर्व घरांमध्ये व झोपडपट्टीमध्ये ६ फॉगिंग मशीनद्वारे धूर फवारणी करण्यात आलेली आहे. तसेच जाहीर प्रसिद्धीकरण पत्रकाव्दारे, टि.व्ही चॅनलव्दारे, स्पिटकरव्दारे व जिल्हा,स्थानिक वर्तमान पत्राव्दारे, डिजीटल बोर्डव्दारे आपल्या घरात व गच्चीवर आसपास डास उत्तपत्ति स्थाने निर्माण होऊ नये व आठवड्यात एक दिवस कोरडा दिवस पाळावा असे जाहीर आवाहन करणेत आले आहे. 




तसेच पंढरपूर शहरातील शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांना आपल्या कर्मचाऱ्या मार्फत डिंगीताप,हिवताप व किटकजन्य रोग नियंत्रणासाठी जनजागृती करण्यात आलेली आहे. शहरातील टायर पंक्चर दुकानामधील निकामी झालेल्या व विनाकारण साठा केलेल्या टायरांचा शोध घेवुन निकामी टायर्स या पुर्वी जप्त करण्यात आलेले आहेत. डेंगी ताप, हिवताप व किटकजन्यरोग नियंत्रणासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. ३ ब्लोअर मशीन द्वारे लिंक रोड, तिरंगा नगर, कर्मयोगी नगर, मॅकानिकल कॉलनी या भागात औषध फवारणी करण्यात आलेली आहे व येत्या आठवड्यात शहरातील सर्व भागात ब्लोअर मशीनद्वारे फवारणी करुन घेण्यात येत आहे. डेंगीच्या  डासाची उत्पत्ती ही स्वच्छ पाण्यात होत असल्याने नागरिकांना आपल्या घराच्या परिसरात, गच्चीवर निकामी टायर्स,गाडगे, कुंडी हौदामध्ये व पाऊसाचे पाणी साठण्या सारखे भंगार सामानात पाणी साचुन राहणार नाही याची काळजी घ्यावी तसेच आपल्या दारासमोर असलेल्या सिमेंटच्या पाण्याच्या टाक्या, रांजण हे आठवड्यातुन दोन वेळा कोरडे ठेवावेत अथवा स्वच्छ करुन घ्यावेत किंवा नगरपरिषदेचे कर्मचारी आपणाकडे आल्यानंतर या पाण्यामध्ये टेमिफॉस औषधाचे द्रावण टाकु देव्या व येणा-या कर्मचा-यास आपल्या घरातील व परिसरातील डासोत्पत्ती स्थाने पाहण्यासाठी व नष्ट करण्यासाठी सहकार्य करावे. असे आवाहन नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसलेउपनगराध्यक्ष विशाल मलपे, मुख्याधिकारी अभिजीत बापट, आरोग्य समिती सभापती अनुसया शिरसट यांनी केले आहे,मुख्याधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली उपमुख्यधिकारी सुनिल वाळुजकर, आरोग्याधिकारी डॉ.संग्राम गायकवाड व प्रभारी जीवशास्त्रज्ञ डी.एफ.गजाकोश, आरोग्य निरिक्षक शरद वाघमारे,  नागनाथ तोडकर व सर्व कर्मचारी ही मोहिम राबवित आहेत.




  



महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments