20 हजाराची लाच घेणार्‍या मंगळवेढ्यातील पोलीस कर्मचार्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी

पंढरपूर LIVE 3 ऑक्टोबर 2018


मंगळवेढा पोलीस स्टेशन आवारातील लाच प्रकरण

अर्धनारी वाळू ठेक्यातून अधिकृत ओव्हर लोड वाळू वाहतुक करणारा  ट्रकला अडवून 20 हजार रूपयाची लाच घेतल्याप्रकरणी पोलीस शिपाई सिध्दनाथ दगडू मोरे (रा.मुढेवाडी, ता.पंढरपूर) याला लाचलुचपतच्या अधिकार्‍यांनी अटक करून पंढरपूर येथील मे.जिल्हा सत्र न्यायाधीश अभिनंदन पाटंगणकर यांच्यासमोर उभे केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 
या घटनेची हकिकत अशी की, कोल्हापूर येथील एम.एच-09,सी.यु-4711 चा मालक यांचा वाळू व्यवसाय आहे. वाळू वाहतूकीसाठी 5 ट्रका आहेत. वाळू भरून येणार्‍या ट्रकला दररोज येथील पोलीस पैसे मागत असल्यामुळे ट्रक मालक व चालक पोलीसांच्या वर्तणुकीला त्रस्त झाले होते. दि.29 सप्टेंबर  २०१८ रोजी सकाळी 11 वा.मंगळवेढा येथे आल्यानंतर यातील आरोपी पोलीस शिपाई सिध्दनाथ मोरे व वाहतूक शाखेचे अन्य दोन पोलीस कर्मचारी यांनी टोळ नाक्यावर सदरचा ट्रक अडवून पैशाची( मंथली ) दर महा ट्रक चालकाकडे मागणी केली व मालकाला प्रत्यक्ष येऊन भेटण्यास सांगितले.सदरचा तो ट्रक मंगळवेढा पोलीस स्टेशन आवारात आणून लावला. दि.1 ऑक्टोबर २०१८ रोजी सायंकाळी 5.22 वा.मंगळवेढा पोलीस स्टेशनच्या आवारात 20 हजारांची लाच स्विकारताना पोलीस शिपाई सिध्दनाथ मोरे याला लाच लुचपत पथकाने पकडले. या घटनेची फिर्याद पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी दिल्यानंतर आरोपी सिध्दनाथ मोरे याला अटक करून मंगळवारी पंढरपूर येथील मे.जिल्हा सत्र न्यायालयात उभे केले. तपासिक अंमलदार पोलीस निरीक्षक कविता मुसळे यांनी लाच कुणासाठी घेतली व दोन वाहतूक शाखेचे पोलीसांचा शोध घेणे आदी मुद्दे मे.न्यायालयासमोर मांडल्यानंतर मे.न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 








  



महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments