'निघाली काॅमेडी एक्सप्रेस' फेम अभिनेता संतोष मयेकर यांचे निधन

पंढरपूर LIVE 3 ऑक्टोबर 2018


मुंबई : चित्रपट, नाटक व दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमांतून दर्जेदार अभिनयासह विनोदाचे उत्तम टायमिंग साधणारे अभिनेते संतोष मयेकर (५२) यांचे मंगळवारी संध्याकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले. बुधवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. मराठी रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावर त्यांनी विविध भूमिका साकारल्या. नाटकांमध्ये प्रामुख्याने त्यांनी विनोदी अभिनेता म्हणून ओळख निर्माण केली होती.
मालवणी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. ‘वस्त्रहरण’ या तुफान लोकप्रिय नाटकात तात्या सरपंचाच्या भूमिकेचे आव्हान उत्तमरीत्या पेलत त्यांनी त्यांचे रंगभूमीवरील स्थान अधिक बळकट केले. आॅल द बेस्ट, प्रेमा तुझा रंग कसा, विच्छा माझी पुरी करा, टाइम प्लीज, भैया हातपाय पसरी, वाऱ्यावरची वरात आदी नाटकांतही त्यांनी दमदार भूमिका साकारल्या. गेल्यावर्षी राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर उमटविणाऱ्या ‘दशक्रिया’ या चित्रपटातील त्यांची भूमिका गाजली होती. देवाशप्पथ खोटे सांगेन, चष्मे बहाद्दर, गलगले निघाले, सत्य सावित्री आणि सत्यवान, सातबारा कसा बदलला, आयपीएल-इंडियन प्रेमाचा लफडा, आर्त आदी चित्रपटांतही त्यांनी लक्षवेधी काम केले होते.
दूरचित्रवाणीवरील फू बाई फू या रिअ‍ॅलिटी शोमधून त्यांनी त्यांची विशेष छाप पाडली. घडलंय बिघडलंय, आभाळमाया, निघाली कॉमेडीची एक्स्प्रेस, ढिंका चिका आदी मालिका व कार्यक्रमांतून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. नाट्यदर्पण पुरस्कार, नाट्य परिषदेचा पुरस्कार, संस्कृती कलादर्पण आदी पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते.





  



महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments