...आणि प्राचार्य डॉ. रोंगे सरांनी केला बसने प्रवास !

पंढरपूर LIVE 2 ऑक्टोबर 2018





श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट मध्ये नो प्रायव्हेट व्हेईकल डेसाजरा !
पंढरपूरः मंगळवारचा दिवस नेहमीप्रमाणेच उजाडला! राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री या महापुरुषांची जयंती असल्यामुळे शाळा महाविद्यालय वगळता सर्व शासकीय कार्यालयांना सुटी असल्यामुळे रस्त्यांवर वाहनांची वाहतूक जवळ जवळ नव्हतीच ! पण स्वेरी परिवारातील प्राध्यापक,शिक्षककेतर कर्मचारी व विद्यार्थी आपल्या नेहमीच्या वाहनावर स्वार झाल्याचे दिसत नव्हते. त्यामुळे स्वेरीने सुट्टी जाहीर केली की काय?, ‘आज स्वेरी महापुरुषांची जयंती साजरी करणार नाही की काय?’ असाही प्रश्न अनेकांना पडला. परंतु स्वेरीची कॉलेज बस वगळता स्वेरीची अन्य कोणतीही खाजगी वाहने रस्त्यावर धावत नव्हती. रोंगे सर मात्र आपल्या निवासस्थानापासून (गेंड वस्ती ,कराड रोड,पंढरपूर) चालतच निघाले. अनेकांना त्यांचे वाहन बंद पडले की काय असे वाटल्याने अनेक वाहन चालकांनी चला सरकॉलेजला सोडतो.’ असे म्हणत रोंगे सरांना गाडीवर बसण्याचा आग्रह करत होते. पण रोंगे सरांनी आज नो ‘प्रायव्हेट व्हेईकल डे साजरा करण्याचे ठरविल्यामुळे आज खाजगी वाहनांचा वापर करायचा नाही’ असे सांगितले. नेहमीप्रमाणे कॉलेज बस आली. बसचे ड्रायव्हर दत्तात्रय  शिंदे हे देखील रोंगे सरांना बस थांब्यावर पाहून अचंबित झाले. डॉ. रोंगे सरांना बस मध्ये चढताना पाहून विद्यार्थ्यांना देखील आश्चर्य वाटले. नो प्रायव्हेट व्हेईकल डे’ च्या निमित्ताने स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ रोंगे सरांच्या बसमधील आगमनाने मात्र नियमीतच्या किलबिलाटा ऐवजी आदरयुक्त शिस्तीमुळे शांतता जाणवत होती. बसमध्ये देखील डॉ. रोंगे सरांनी  विद्यार्थिनीं समवेत संवाद साधत अडचणी विचारल्या.   

         त्याचे झाले असे कीश्री विठ्ठल एज्युकेशन अॅंड रिसर्च इन्स्टिटयूट पंढरपूर अंतर्गत असणाऱ्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या मेसा (मेकॅनिकल इंजिनिअररिंग स्टुडंट असोशिएशन) तर्फे आयोजिलेल्या अभियांत्रिकी व फार्मसी (पदविकापदवीपदव्युत्तर पदवी) व एम.बी.ए विभागामधील सर्वच सदस्यांनी नो प्रायव्हेट व्हेईकल डे’ च्या निमित्ताने आपल्या खाजगी गाड्यांना विश्रांती देवून काहीजण बस,टमटमरिक्षाने तर काही प्राध्यापक चालत कॉलेज गाठत होते. नो प्रायव्हेट व्हेईकल डेच्या निमित्ताने संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे म्हणाले इंधन बचाव व पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या हेतूने आज नो प्रायव्हेट व्हेईकल डे’ अभियानाचे आयोजन केले होते. यामध्ये संस्थेअंतर्गत असणाऱ्या सर्वच सदस्यांनी या एकदिवसीय नो प्रायव्हेट व्हेईकल डे’ च्या अभियानात सहभाग नोंदविला. 

संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या बरोबर काही प्राध्यापक वर्ग हे बसमध्ये बसले. तसेच डिप्लोमाचे प्राचार्य प्रा. एन.डी. मिसाळ,  बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. एस.डी. सोनवणे ,डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे, अभियांत्रिकीचे उपप्राचार्य प्रा. एस.एन.कुलकर्णी, प्रशासन अधिष्ठाता डॉ. रणजीत गिड्डे, प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ. पी.एस. कचरे, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, विभागप्रमुख प्रा सचिन गवळी, ग्रंथपाल प्रा. एस. एम. बागल,काही प्राध्यापक, विद्यार्थी बसमधून आले तर फार्मसीचे डॉ. तुषार शेळके, प्रा. बापुराव अंकलगी चक्क चालत आले तर काही विद्यार्थी सायकलवरून कॉलेजला आले. 

पंढरपूर शहरापासून ते कॉलेज दरम्यान अनेक प्राध्यापक वर्ग इतर बसमधून आले. विशेष म्हणजे बस मधून उतरताना सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे यांच्यासह इतर प्राध्यापकांनी बसचे कुपण खरेदी करून वाहक शिंदे यांच्याकडे दिले. दररोज खचाखच भरलेल्या वाहन तळाची जागा आज रिकामी दिसत होती. कॅम्पसमधील वाहनांची सर्व जागा आज काही सायकलींनी घेतली होती. त्यामुळे परिसरात सायकलचा ‘ट्रिंग ट्रिंग’ असा एकच आवाज ऐकू येत होता. स्वेरीच्या या नो प्रायव्हेट व्हेईकल डे’ चे पढरपूरकरांनी उत्साहाने स्वागत केले.








  



महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments