पंढरपूर LIVE 2 ऑक्टोबर 2018
मोहोळ तालुक्यातील एका ठेकेदारांकडुन नियमबाह्य होणार्या वाळुउपशाच्या विरोधात अ.भा. छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नागेश गायकवाड हे मोहोळ तहसिल कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषणास बसले आहेत. याबाबत पंढरपूर लाईव्ह शी बोलताना त्यांनी खालीलप्रमाणे माहिती दिली.
अर्धनारी ता.मोहोळ येथे ठेकेदाराला एक लाख ब्रास वाळु उपसा करण्याचाच परवाना आहे परंतु; ज्या ठिकाणा वरुन वाळु उपश्याची परवानगी दिलेली आहे. त्या ठिकाणा वरुन एक लाख ब्रास पेक्षा जास्त वाळु उचलण्यात आल्याचे दिसुन येते. या ठिकाणावरून पाच ते सहा लाख ब्रास वाळु आतापर्यंत उपसली आहे. आणि वाळु ठेक्याच्या ठिकाणी वाळु उपश्यामुळे १५ ते २० फुटाचे खोल जे.सी.पी.ने खड्डे पाडले असुन यामुळे नदीचे विद्रुपीकरण झाले असुन यामुळे नदीचे पाञ बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ओव्हरलोड वाहतुकीमुळे गावातील आतंर्गत उपरस्ते खराब झालेले असुन खड्डे पडले आहेत. तसेच यां ओव्हरलोड वाळु वाहतुकीस कोणीही रोखत नसुन अधिकारी वर्ग कोणत्याही प्रकारची कारवाई ठेकेदारावर करताना दिसत नाही. संबंधित ठेकेदाराकडून होणारा नियमबाह्य वाळुु उपसा थांबवण्याची कारवाई महसुल विभागाने करावी. हा आतिरीक्त वाळु उपसा सुरु असुन शासनाचे लाखो रूपयाचे नुकसान ठेकेदारांकडुन होत असुन या ठेक्याचा शासन स्तरावर पंचनामा करून अतिरीक्त उपसा केलेल्या वाळुचा दंड ठेकेदारांकडुन वसुल करून दंडात्मक कारवाई करण्यात यावी तसेच आर्धनारी गावातील वाळुचा ठेका बंद करण्यात यावा. अशी मागणी अ.भा.छावा मराठा युवा संघटन कडुन करण्यात आली होती...
मा.जिल्हाधिकारी व मा.प्रांताधिकारी मोहोळ यांना निवेदन देवुनही दखल न घेतल्या मुळे महात्मा गांधी जयंती दिवशी म्हणजे २ आॅक्टोबर रोजी तहसिल कार्यालयाच्या आवारात मोहोळ येथे अ.भा.छावा युवा संघटनचे जिल्हाध्यक्ष नागेश गायकवाड हे आमरण उपोषणास बसलेले आहेत.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
0 Comments