आपल्या कर्तव्यात प्रामाणिक असाल तर प्रत्येक कार्यात यश मिळेल -महाअभिवक्ता अॅड आशुतोष कुंभकोणी

पंढरपूर LIVE 28 ऑक्टोबर 2018



स्वेरीत सरकारी अभियोक्ता कार्यशाळा’ संपन्न
 पंढरपूर- (संतोष हलकुडे )तुम्ही ज्या क्षेत्रात कार्य करीत आहात त्या क्षेत्रात मन लावून काम करताना त्याच्या जोडीला परिश्रमाबरोबरच एकनिष्ठतेची जोड देवून प्रामाणिकपणे कार्य केल्यास आपल्या अंगीकृत व्यवसायात हमखास यश मिळतेअसे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे महाअभिवक्ता अॅड आशुतोष कुंभकोणी यांनी केले
          येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँण्ड रिसर्च इन्स्टिट्युट,पंढरपूर संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात आखिल भारतीय अधिवक्ता परिषद (पश्चिम महाराष्ट्र प्रांत) यांच्यातर्फे सरकारी अभियोक्ता कार्यशाळा २०१८’ चे आयोजन केले होते. याप्रसंगी कार्यशाळेचे उदघाटन करताना महाअभिवक्ता अॅड.कुंभकोणी उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड चंद्रशेखर कुलकर्णी होते तर सत्र अध्यक्ष म्हणून पुण्याचे सरकारी वकील अॅड विद्याधर कुलकर्णी होते. यावेळी सरकारी वकील अॅड नितीन आपटेअॅड वांगीकरमहाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सरकारी वकील उपस्थित होते. सोलापूरचे जिल्हा सरकारी वकील अॅड प्रदीपसिंग राजपूत यांनी सर्वांचे स्वागत करून सरकारी वकिलांची कार्यशाळा का आयोजन करावी लागली हे सांगून सरकारी वकिलांची कार्य मर्यादा स्पष्ठ केल्या. साताऱ्याचे जिल्हा सरकारी विकिल अॅड महेश कुलकर्णी यांनी प्रस्तावनेत सरकारी वकिलांची नेमकी भूमिका सांगून सरकारी वकिलांचे कामकाज हे राजहंसाप्रमाणे आहे हे पटवून दिले. पुढे बोलताना अॅड. कुंभकोणी म्हणाले की,’ तुमच्या व्यवसायाची प्रसिद्धी करणे अत्यंत आवश्क आहेपरंतु मिळणाऱ्या यशाला कोणताही शॉर्टकट नसतो.त्यामुळे प्रत्येकाला अडचणी ह्या येतच असतात परंतु त्यांचा बाऊ न करता सर्व अडचणीवर मात करून यशालाध्येयाला गवसणी घातली पाहिजे. एक सुंदर कार्यशाळा आयोजिल्याबद्धल सरकारी वकिलांचे विशेष आभार पण अशा कार्यशाळेचे आयोजन सातत्याने केल्यास त्यातून महत्वपूर्ण माहिती मिळते व मार्गही निघू शकतो.’ असे सांगून त्यांनी निकालानंतरचा पाठपुरावा करून त्यावर चर्चा होणे आवश्यक असल्याचे सांगितले. दुसऱ्या सत्रात सायबर ज्युरीक्सचे विनायक राजाध्यक्ष यांनी न्यायालयात सादर करण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक पुराव्याबाबत मत व्यक्त केले तर अॅड. नितीन आपटे यांनी वकिली व्यवसाय करताना पाळावयाचे नियम सांगितले. चौथ्या सत्रात तथा कार्यक्रमाचा समारोप करताना अॅड. राम आपटे यांनी अधिवक्ता परिषद व त्याची कार्ये’ सांगितली. यावेळी स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्यासह सांगलीचे सरकारी वकील अॅड. उल्हास चिपरे ,कोल्हापूरचे सरकारी वकील अॅड. व्ही.एच. शुक्लरत्नागिरीचे सरकारी वकील अॅड. व्ही.बी.गांधीबार्शीचे सरकारी वकील अॅड. प्रदीप बोचरे,प्रांत कार्यकारी सदस्य अॅड. दीपक धोपे,अॅड. आनंद देशपांडेअॅड. विनायक देशपांडे,वि.ही.प.चे जिल्हामंत्री बापू ढोले व डॉ. जयंत पाटील यांच्यासह महाराष्ट्रातील सोलापूरपुणेसांगलीसाताराकोल्हापूर,सिंधुदुर्ग व रत्नागिरी या सात जिल्ह्यातून तब्बल ६९ सरकारी वकील या एकदिवसीय कार्यशाळेला उपस्थित होते.कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी अॅड.प्रकाश जन्नूअॅड. दत्ता पवारअॅड. शीतल डोकेअॅड. संग्राम पाटील आदींनी प्रयत्न केले. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थित वकिलांनी स्वेरी कॅम्पसमध्ये फिरून सविस्तर माहिती जाणून घेतली. सूत्रसंचालन अॅड. शैलजा क्यातम यांनी केले तर उपस्थितांचे आभार अॅड. सारंग वांगीकर यांनी मानले. 










महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments