पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने टाटा कंपनीचे रोड स्वीपर मशीन पूजन

पंढरपूर LIVE 28 ऑक्टोबर 2018


पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने टाटा कंपनीचे रोड स्वीपर मशीन पूजन आमदार प्रशांतराव परिचारक यांचे शुभ हस्ते नगराध्यक्षा सौ साधना नागेश भोसले यांचे अध्यक्षतेखाली , उपनगराध्यक्ष विशाल मलपे, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट पक्षनेते अनिल अभंगराव,गुरुदास अभ्यंकर,मुख्याधिकारी अभिजीत बापट पाणीपुरवठा समिती सभापती सूप्रिया डांगे, यांचे प्रमूख उपस्थितीत करण्यात आला,यावेळी बोलताना आमदार प्रशांतराव परिचारक यांनी सांगितले की, शहरात धुळी चे प्रमाण जास्त आहे त्यामुळे स्वच्छ भारत अभियान राबवित असताना ५९ लाख रुपये  किंमतीचे हा रोडस्वीपर खरेदी करण्यात आला आहे या वाहनाची मुख्य इंजिनची क्षमता ५६७५ सीसी असून  हे वाहन पूर्णपणे हायड्रोलिक सिस्टीम वर चालणार आहे.या वाहनामध्ये धूळ साठवण्याच्या कंटेनर मोठी क्षमता व  सुविधा आहे  तसेच पाण्याचे जेटिंग पंप असून रस्ते साफसफाईच्या  वेळी  वाहनाच्या दोन्ही बाजूस साफ रस्ते साफ करण्यासाठी ब्रश आहेत त्यामुळे शहरातील धूळ कमी होण्यास मदत होणार आहे यावेळी नगरसेवक शकुंतला नडगिरी,संजय निंबाळकर,विक्रम शिरसट, मालोजी शेबडे,विवेक परदेशी,आदित्य फत्तेपुरकर, श्रीनिवास बोरगावकर, अमोल डोके,शंकर पवार,नवनाथ रानगट,नारायण शिंगण उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर, डॉ संग्राम गायकवाड, शरद वाघमारे, नागनाथ तोडकर हे उपस्थित होते.













महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments