पंढरपूर LIVE 5 ऑक्टोबर 2018
स्वेरीत राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहाद्दुर शास्त्री यांची जयंती साजरी !
पंढरपूरः-‘राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या स्वावलंबी व अहिंसा वृत्तीचे संपूर्ण जगाने स्वागत केले असून त्यांनी स्वच्छतेची शिकवण दिली. ‘अहिंसा परमो धर्म’ या सूत्राचा वापर त्यांनी आयुष्यभर केला. त्यांचे विचार परिवर्तन करणारे होते. त्याग,शांती,अहिंसा हे गुण असल्यामुळे त्यांचे कार्य जगात उठावदार ठरले. याच ‘गांधी’विचारांमुळे जगाच्या नकाशात भारताची स्वतंत्रपणे ओळख निर्माण झाली. संपूर्ण जगाला प्रेरणा देणाऱ्या गांधीजींचे विचार आज आचरणात आणण्याची खरी गरज आहे.’ असे प्रतिपादन पुणे येथील के.जी.एज्युकेशनल इन्स्टिटयूटचे कार्यकारी संचालक प्रा. हेमंत अभ्यंकर यांनी व्यक्त केले.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूटच्या ओपन अॅम्पी थिएटरमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५० वी जयंती व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहाद्दुर शास्त्री यांची ११४ वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणुन कार्यकारी संचालक प्रा. अभ्यंकर बोलत होते. महात्मा गांधी व लालबहाद्दुर शास्त्री यांच्या प्रतिमेच्या पुजनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. प्रास्ताविकात संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी ‘कोणतेही काम असो अथवा इतरांना सल्ला द्यायचा असो गांधीजी सर्व प्रथम स्वतः आचरणात आणायचे.त्यानंतर ते दुसऱ्यांना सांगायचे. त्यामुळे त्यांचे जीवन तर यशस्वी झाले त्याचबरोबर त्यांच्या विचारसरणीतून आपल्या मर्यादाही स्पष्ट झाल्या. त्यामुळे गांधीजींचे विचार आजही प्रेरणा देणारे आहे.’असे सांगितले. जिल्ह्य न्यायालयातील विशेष सरकारी वकील अॅड. प्रदीप राजपूत म्हणाले,‘येथील मुलांमधील प्रगती पाहता स्वेरीमुळे शिक्षणाचा दर्जा उंचावट चालला आहे. भाषा,ज्ञान वाढले असून विद्यार्थ्यांनी गांधीजींचे कार्य समजून घ्यावे.’ असे सांगितले. सत्याग्रहीचे संपादक सतीश देशपांडे म्हणाले की,’ गांधी हा विषय नुसता वाचून नव्हे तर समजून घेण्याचा विषय आहे. त्यांचे कार्य आणि समाजव्यवस्था पाहिले असता जगातील इतर देश देखील गांधीजींची शिकवण आचरणात आणत आहेत.’ असे सांगून भारतरत्न सचिन तेंदुलकर हे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असताना नेल्सन मंडेला याना भेटण्यास गेले असता मंडेला यांनी ‘ हा गांधींच्या गावचा माणूस आहे.’ अशी ओळख करून देत तेंडूलकर यांचा मोठा गौरव केला होता. यावरून गांधींजींच्या कार्याची कल्पना येते.’असेही ते म्हणाले. पुढे बोलताना कार्यकारी संचालक प्रा. अभ्यंकर म्हणाले की, ‘जगात कुठेही वावरताना तेथील आखून दिलेले नियम पाळले पाहिजे. जगातील निम्मे तरुण एकट्या भारतात आहेत आणि या भारतातील तरुणांना जगात संधी उपलब्ध झाले आहे. यासाठी संधीचे सोने करण्याकरीता जगात कुठेही जा, इंग्रजी भाषा मात्र आली पाहिजे. स्वेरीतील शिक्षण पद्धत पाहता शहरातील विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील मुले भारी ठरत आहेत.’ असे सांगून संशोधनामधील अनुभव सांगितले. अध्यक्षस्थानावरून बोलताना ज्येष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे यांनी ‘गांधीजींचा विषय बोलण्याऐवजी कृतीतून पुढे आला पाहिजे.यासाठी क्षमता व सहनशीलता असावी लागते. यासाठी आपल्या कार्यातून समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत योगदान देत असताना विद्यार्थ्यांनी उत्तम अभियंता होण्यासाठी स्वतःची उत्तमता देखील सिद्ध करावी.’ असे सांगितले. यावेळी स्वेरीयान या पाक्षिकाचे देखील प्रकाशन करण्यात आले. यावेळी गांधी व शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून घेतलेल्या ‘स्वच्छता’ व ‘निबंध’ स्पर्धेत तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते रोख पारितोषक, स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले. यावेळी पंढरपूर न्यायालयातील सरकारी वकील अॅड सारंग वांगीकर, पालक संघाचे दैठणकर, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. एस.डी. सोनवणे, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे, सर्व अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख,प्राद्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, स्वेरी अंतर्गत असणाऱ्या चारही महाविद्यालयांतील विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.यशपाल खेडकर यांनी तर संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी.बी. नाडगौडा यांनी आभार मानले.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 35 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com






0 Comments