पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात "जागृत बेटी" या विषयावर मार्गदर्शन

पंढरपूर LIVE 5 ऑक्टोबर 2018



*सावित्रीबाई फुले गर्ल्स फोरम व लायन्स कल्ब पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित*

पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (पंढरपूर) येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील सावित्रीबाई फुले गर्ल्स फोरम व लायन्स कल्ब पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला "जागृत बेटी" हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
   पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या "जागृत बेटी" या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, डॉ. संध्या गावडे, वेदिका बडवे, सह लायन्स कल्ब पंढरपूरचे पदाधिकारी यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले, सरस्वती व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
   यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थिनीना मार्गदर्शन करताना डॉ. संध्या गावडे म्हणाल्या, सध्याच्या ढासळलेल्या नीतीमूल्ये व संस्कारांच्या काळात महिलांनी स्वत: ला जागृत ठेवणे आज काळाची गरज आहे. या धावपळीच्या जीवतात आपण आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. महिलाचे हक्क या विषयावर जनजागृती करुन सामान्य महिलांमध्ये आपल्याच्या हक्काबाबत कायदे व नियमांची जाणीव करुन देणे महत्वाचे आहे. आपण जागृत झालो तरच आपली बेटी जागृत होईल. महिलांनी इतिहास जाणून घेऊन त्या पासून प्रेरणा घेऊन स्वत:साठी जगावे, योग्य वयात योग्य ती काळजी घेतली पहिले समाजात आपण जागृत राहून स्वत:ला कमी न लेखता आत्मविश्‍वास जागृत ठेवून ध्येयप्राप्त करावे असे प्रतिपादन डॉ. संध्या गावडे यांनी केले.
    या कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले गर्ल्स फोरमच्या चेअरमन प्रा. अंजली पिसे, लायन्स क्लब प्रोजेक्ट मॅनेजर व पंढरपूर सिंहगडच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात शिक्षण घेत असलेल्या कुमारी वेदिका बडवे, ज्योती कटेकर, राजीव कटेकर, तृप्ती गणमोटे आदी सह, पंढरपूर लायन्स कल्ब च्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. उपस्थितीत सर्व पदाधिका-याचायावेळी पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कुमारी गिरीजा दामोदरे व कुमारी वैष्णवी गुलाखे यांनी केले तर उपस्थिती मान्यवरांचे आभार डॉ. राजश्री बाडगेयांनी मानले.

फोटो ओळी:- पंढरपूर सिंहगड मध्ये  "जागृत बेटी" या कार्यक्रमाचे उद्घाटन करताना प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, पंढरपूर लायन्स कल्ब च्या महिला पदाधिकारी व इतर.






  



महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments