सांगोला तालुक्यातील दुध संकलन केंद्रातील दुधात भेसळ... आरोग्याशी खेळ करणारे मानवजातीला कलंक! दुधात भेसळ करणार्‍या नालायकांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी!!

पंढरपूर LIVE 4 ऑक्टोबर 2018


सांगोला तालुक्यातील दत्त दुध संकलन केंद्र यैथून भेसळयुक्त दुध सर्वसामान्य जनतेला वितरीत केले जात होते हे सिद्ध झाले आहे. सर्वसामान्य माणसांच्या आरोग्याशी खेळ करणारे संबंधित आरोपी हे संपूर्ण  मानवजातीला कलंकच आहेत. जे दुध अबाल बालकं व वृध्द मंडळी अमृत समजून पित असतात त्या दुधात सुद्धा भेसळ होतेय ही बाब गंभीर आहे. दुधामध्ये भेसळ करण्याचं पाप करणाऱ्या अशा नालायकांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी. अशी मागणी जोर धरत आहे.
याबाबत अधिक माहिती पुढीलप्रमाणे...

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आज दि. ०४/१०/२०१८ रोजी श्री दत्त दुध संकलन केंद्र, मानेगाव ता.सांगोला या पेढीचे मालक श्री धनाजी महादेव बाबर यांच्या राहत्या घरावर धाड टाकून झाडाझडती घेतली असता घराच्या बाहेरील बाजूस एका ४० लि. च्या कॅन मध्ये सुमारे ३९ लि. सफेद रंगाचे द्रावण भेसळीसाठी बनविल्याचे आढळून आले असता सखोल तपासणी कामी घराची तपासणी केली असता घरामध्ये साठवून ठेवलेले सफेद रंगाच्या पावडरची १पिशवी(०७ कि.), पिवळसर रंगाच्या पावडरच्या ०४ पिशव्या(प्रत्येकी अंदाजे २५ कि.) व रिफाईण्ड सुर्यफुल तेलाचे ०३ (प्रत्येकी १५ कि.) डबे असा साठा भेसळ करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवल्याचे आढळले. सदर ठिकाणी विश्लेषणासाठी
१. गाय दूध 
२. सफेद द्रावण (अपमिश्रक)
३. सफेद रंगाची पावडर (अपमिश्रक)
४. पिवळसर रंगाची पावडर (अपमिश्रक)
५. रिफाईण्ड सुर्यफूल तेल(अपमिश्रक) या अन्नपदार्थांचे नमुने घेण्यात आले व सदर ठिकाणी ५२३ लि. गाय दूध, ९८ कि. पिवळसर रंगाची पावडर, ०५ कि. सफेद रंगाची पावडर व ४३.४ कि. रिफाइण्ड सुर्यफूल तेल व ३८ लि. सफेद रंगाचे द्रावण असा एकूण मिळून रूपये ३४००७/-चा मुद्देमाल जप्त करण्यात आला व ५२३ लि. दूध व ३८ लि. सफेद रंगाचे द्रावण नाशवंत स्वरुपाचे असलेल्या कारणाने व पुढील आदेश होईपर्यंत योग्य त्या तापमानाला साठविण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने सदर साठा जागेवरच नष्ठ करण्यात आला व हजर व्यक्तीस पुढील आदेश होईपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत.सदर अस्थापनेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार आहे. सदर आस्थापनेवर अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अंतर्गत कारवाई होणार असून पोलिसांना FIR देण्यात येणार आहे. सदरची कारवाई सहाय्यक आयुक्त (अन्न) श्री. प्र. मा. राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. मंगेश लवटे यांनी अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. योगेश देशमुख व डॉ. उमेश भुसे यांच्या सहकार्याने पार पाडली.









  



महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments