पंढरपूर LIVE 21 ऑक्टोबर 2018
माणसातील वासनांध हैवानांनी विद्यार्थिनींच्या अब्रुवर घाला घातल्याच्या घटना पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागात घडत असल्याचे उघड होत आहे. या घटना पहाता पंढरपूर तालुक्यातील विद्यार्थिनींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
पंढरपूर तालुक्याच्या सुपली येथील नववीत शिकत असलेल्या विद्यार्थीनीवर तिच्या शिक्षकानेच अत्याचार केल्याची घटना उघडकीस आलीय. तर दुसऱ्या एका घटनेत पंढरपूर तालुक्यातील गार्डी येथे शेजारच्या च एकाने विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याची ही घटना समोर आली आहे. पंढरपूर तालुक्यात वासनांध हैवान बनून बिनबोभाट विद्यार्थिनींची अब्रु लुटणाऱ्या अशा नराधमांना कठोरात कठोर शिक्षा होणं आवश्यक आहे. तरच अशा घटनांना आळा बसेल. अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून उमटत आहे.
सुपली (ता.पंढरपूर) येथील एका शाळेत इयत्ता नववीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनीला नंदकुमार कोळवले या वासनांध शिक्षकाने भेटायला बोलावले आणि तिला जीपमध्ये बसवून अकलूज येथे नेले. त्यानंतर त्याने अकलूज येथे तिच्यावर पाशवी अत्याचार केले. या मुलीने तिच्या घरच्यांना हा प्रकार सांगितला. मात्र समाजात अब्रू जाऊ नये म्हणून तिच्या घरच्यांनी या प्रकाराची वाच्यता केली नाही. या घटनेनंतर या शिक्षकाने सांगोला तालुक्यातील अजनाळे येथे बदली करून घेतली. मात्र त्यानंतरही त्याने या मुलीला धमकावणे सुरूच ठेवले. त्यातच या मुलीवर केलेल्या अत्याचाराचे फोटो व्हायरल झाले आणि नराधम कोळवलेचा खरा चेहरा लोकांसमोर आला.
निर्भया पथकाने या कुटुंबाचे समुपदेशन केल्यावर अखेर या कुटुंबाने शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून शाळेने मात्र अजूनही या शिक्षकावर कोणतीही कारवाई केलेली नाही.
वरील घटना ताजी असतानाच गार्डी येथील शाळेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर शेजाऱ्याने अत्याचार केल्याचं उघड झालं आहे. राहुल फाटे या व्यक्तीने शेजारी राहणाऱ्या सदर विद्यार्थीनीला शेतात बोलावून तिच्यावर अत्याचार केले. या प्रकारानंतर संतप्त ग्रामस्थांनी या नराधमावर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली. दरम्यान, दोन्ही घटनांप्रकरणी पंढरपूर ग्रामीण पोलिसांत पोस्कोसह इतर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणातील दोन्ही आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





0 Comments