पंढरपूर LIVE 22 ऑक्टोबर 2018
मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – संपूर्ण राज्यात दुष्काळ पडला आहे शेतकरी हवालदिल झाला असून शेत जनावराने अन्न व पाणी मिळत नसल्याने अत्यंत दुरावस्थात आहेत अश्यात सरकारने दि. 31 ऑक्टोबर पूर्वी राज्यामध्ये दुष्काळ जाहीर करून, दुष्काळ निवारणाच्या सर्व उपाययोजना न केल्यास किसान क्रांती जनांदोलन च्या वतीने राज्यभरामध्ये यंदाची दिवाळी सर्व शेतकरी काळी दिवाळी म्हणून साजरी करतील असे अशी माहिती राष्ट्रीय किसान महासंघ कोअर कमिटी सदस्य तथा किसान क्रांति जनांदोलन समन्वयक शेतकरी पुत्र संदीप आबा गिड्डे-पाटील यांनी दिली आहे.
यावेळी शेतकरी पुत्र गिड्डे-पाटील म्हणाले की, संपूर्ण राज्यभर दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून सध्याच्या परिस्थितीमध्ये सरकार केवळ वेळकाढूपणा करीत आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार या वर्षी 112% पाऊस पडणार होता, मात्र परतीच्या पावसाने दगा दिल्यामुळे राज्यातील सर्व पिके वाया गेली आहेत. शेतकरी सध्या पूर्ण कंगाल झालेला आहे. या परिस्थितीमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची परिस्थिती असताना देखील सरकार केवळ बैठका व कागदी सोपस्कर करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. या शेतकरीविरोधी व ढोंगी सरकारचा निषेध करण्यासाठी दि. 31 ऑक्टोबर पूर्वी राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून दुष्काळ निवारणाच्या सर्व उपाययोजना जर केल्या नाहीत, तर येणारी दिवाळी राज्यातील सर्व शेतकरी काळी दिवाळी म्हणून साजरी करणार आहेत. यासाठी किसान क्रांती जनांदोलन, राज्यातील शेतकरी चळवळीतील सर्व शेतकरी नेते व सर्व शेतकरी संघटनांची लवकरच व्यापक बैठक आयोजित केली जाणार असून या बैठकीमध्ये आंदोलनाची रणनीती व जिल्हावार कृती समित्या स्थापन केल्या जाणार आहेत, असे गिड्डे-पाटील यांनी सांगितले. यासाठी राज्यामध्ये दुष्काळ जाहीर होणे गरजेचे आहे आणि फक्त दुष्काळ जाहीर होऊन उपयोगाचे नाही तर दुष्काळासाठीच्या सर्व उपाययोजना या आता शेतकऱ्यांनी सरकारच्या मानगुटीवर बसून करून घेणे गरजेचे आहे, तसेच संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना या दिवाळीत शेतकरी विरोधी सरकारच्या पायाखालची वाळू घसरली पाहिजे या साठी एकत्र आले पाहिजे असे आव्हान केले आहे.
संदीप गिड्डे
दुष्काळ जाहीर झाल्यानंतर सरकारने करावयाच्या उपाययोजना
# दुष्काळ जाहीर करणे म्हणजे फक्त चारा छावण्या व टँकर चालू करणे नव्हे. #
@ दुष्काळ जाहीर केल्यानंतर नियमानुसार सरकारला खालील गोष्टी कराव्या लागतात
# कोणत्याही प्रकारची कर्जाची वसुली बँकांना करता येत नाही.
# थकित कर्ज माफ करणे.
# चालू कर्जावरील व्याज माफ होते व कर्जाचे पुनर्गठन होते.
# एकरी 10 हजार रुपयांचे तात्काळ कर्ज बँकांना विनाअट द्यावे लागते. त्यासाठी जिल्हास्तरीय बँकिंग समितीमध्ये जिल्हाधिकारी निर्णय करतात.
# शेतकऱ्यांचे पशुधन जगविण्याची जबाबदारी राज्य सरकारची येते.
# नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची जबाबदारी राज्य सरकारवर येते.
@ काळ्या दिवाळीचे स्वरूप
# दिवाळी सणादरम्यान नवीन कपडे नवीन वस्तू अशी कोणतीही नवीन खरेदी करायची नाही.
# दिवाळी दरम्यान नवीन कपडे परिधान करायचे नाहीत.
# दिवाळीमध्ये गोडधोड फराळाचे बनवायचे नाही.
# दिवाळी सणा दरम्यान कोणत्याही प्रकारचे लाइटिंग करणे, फटाके वाजवणे किंवा दिवे लावायचे नाहीत.
@ काळी दिवाळी आंदोलनातून वगळण्यात आलेल्या गोष्टी
# घरातल्या देवघरामध्ये देवाची पूजा करणे.
# बलिप्रतिपदेदिवशी बळीची पूजा करणे.
# भाऊबीजेदिवशी साध्या पद्धतीने बहिणीने भावाला ओवाळणे.
# शिव छत्रपतींचा इतिहास जागवण्यासाठी लहान मुलांनी बनवायचा किल्ला.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com






0 Comments