स्वेरीच्या करणकुमार बनसोडे यांना गोल्डमेडल प्राप्त

पंढरपूर LIVE 27 ऑक्टोबर 2018


पंढरपूर- येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँण्ड रिसर्च इन्स्टिट्युट,पंढरपूर संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या अंतीम वर्षातीलकरणकुमार बनसोडे यांना सोलापूर विद्यापीठ, सोलापूर अतर्गत समर गांधी महाविद्यालय माळशिरसमध्ये घेण्यात आलेल्या बॉक्सींग स्पर्धेत ६० किलो ते ६४ किलो वजन गटात सुवर्णपदक प्राप्त झाले.
       तसेच सुदर्शन शिंदे यांना ८१ ते ९१ किलो वजनी गटात रौप्य पदक तर अनिकेत तारापुरकर यांना कास्य पदक मिळाले. सुवर्णपदक प्राप्त झाल्यामुळे बनसोडे यांची पुढील निवड ऑल इंडिया स्तरावरील होणाऱ्या स्पर्धेत झाली असून पुढील महिन्यात बॉक्सींग स्पर्धा होणार असून त्यासाठी बनसोडे यांची निवड झाली आहे. बनसोडे यांना क्रीडा मार्गदर्शक प्रा. रजनी वाघमोडे व कैवल्य उत्पात यांचे मार्गदर्शन लाभले असून स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, अध्यक्ष प्रा. सी.बी. नाडगौडा तसेच स्वेरी व्यवस्थापनमधील पदाधिकारी, विश्वस्त, इतर तिन्ही महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.













महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments