पंढरपूर LIVE 27 ऑक्टोबर 2018
पंढरपूर सिंहगड पब्लिक स्कूल मध्ये "अॅथलॅटीक मिट २०१८" स्पर्धेचे शानदार उद्घाटन
पंढरपूर (प्रतिनिधी) सद्या मुलांमध्ये मोबाईल वापरण्याचे प्रमाणात खूप वाढले आहे. यामुळे मुले अभ्यासाकडे, खेळाकडे दुर्लक्ष करीत आहेत. विद्यार्थ्यांनी व्हटसप, फेसबुक, गेम यासारख्या सोशल मिडीयावर खेळ-खेळत बसून वेळ वाया घालविण्यापेक्षा तो वेळ शारीरिक खेळ खेळण्यात घालविला तर शरीर सदृढ राहील. विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी जिल्हास्तरीय अॅथलॅटीक मिट सारख्या स्पर्धा घेणे आज काळाची गरज आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्वाचे डॉ. कैलाश करांडे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
जिल्हास्तरीय "अॅथलॅटीक मिट २०१८" स्पर्धेचे उद्घाटन पंढरपूर सिंहगड इन्स्टिट्यूटचे कॅम्पस डायरेक् टर व एस. के. एन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयांचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, इस्टेट मॅनेजर कर्नल धपोला, कोर्टी पंढरपूर पब्लिक स्कुलच्या प्राचार्या डॉ. उषा धपोला, मुख्याध्यापिका स्मिता नवले आदी सह विविध स्कुलच्या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या "अॅथलॅटीक मिट २०१८" स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील ९ सीबीएसई शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेमधून विद्यार्थ्यांच्या शारीरिक खेळातून त्यांचा मानसिक व बौद्धिक क्षमतेचा विकास व्हावा हा मुख्य हेतू आहे. विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व आजच्या धावपळीच्या युगात अत्यंत महत्वपूर्ण होत आहे, या स्पर्धेमध्ये वय वर्ष १२, १४, व १७ गटा अंतर्गत गोळाफेक, भालाफेक , धा वणे, लांब उडी आदी सह इतर खेळ प्रकारांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील सिंहगड पब्लिक स्कूल केगाव (सोलापूर) सिंहगड पब्लिक स्कूल कोर्टी (पंढरपूर), सिंहगड पब्लिक स्कूल कमलापूर (सांगोला), एमआयटी स्कूल पंढरपूर, एमआयटी स्कूल सोलापूर, एमआयटी स्कूल बार्शी, लोटस पब्लिक स्कूल, पंढरपूर, ऑर्चिड स्कूल सोलापूर, ग्रीन फिंगर स्कूल अकलूज या शाळा मधील विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थांना प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंढरपूर सिंहगड पब्लिक स्कुलच्या सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com








0 Comments