६ व्या माय मुंबई आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात रामायण आणि महाभारत एकाच व्यासपीठावर

पंढरपूर LIVE 23 ऑक्टोबर 2018

६ व्या माय मुंबई आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात 
रामायण आणि महाभारत एकाच व्यासपीठावर 



P1040848.JPG
# दंगल फेम बालअभिनेता 'रित्विक सहोरे' ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता 
# स्पेनची 'टू रिमेम्बर मी बाय' आणि बांगलादेशची 'दि गर्ल्स आर नॉट ब्राइड्स' यांना पारितोषिके 
# इराण, इराक, बांगलादेश ह्या देशांतील फिल्ममेकर्स ची विशेष उपस्थिती. 
# पारितोषिक वितरण सोहळ्यात रामायण आणि महाभारत एकाच व्यासपीठावर
# जगातील ६ उपखंडातून, ६४ भाषांच्या, ८३ देशांच्या, १५०० हुन अधिक लघुपटांचा प्रतिसाद   

मुंबई, प्रतिनिधी: जगभरातील ६ उपखंडातून १५०० हुन अधिक लघुपटांचा प्रतिसाद मिळालेला ६ वा माय मुंबई आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव 'युनिव्हर्सल मराठी' आणि 'रितंभरा विश्व विद्यापीठा च्या मालिनी किशोर संघवी कॉलेज' यांच्या संयुक्त विद्यमानाने मुंबईच्या जुहू किनाऱ्याजवळील मालिनी किशोर संघवी शांतीप्रभा प्रेक्षागृहात मोठ्या दिमाखात संपन्न झाला. स्पर्धेत 'समीरा', 'प्रॉन्स', 'टूलेट' आणि स्पेन च्या 'टू रिमेम्बर मी बाय' ह्या लघुपटांनी अधिकाधिक पारितोषिके पटकावली. सर्वोत्कृष्ट अभिनेता चा पुरस्कार 'रित्विक सहोरे' तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार 'हिमानी त्यागी' हिला देण्यात आला.  रित्विक सहोरे ह्या अभिनेत्याने ह्यापूर्वी हिंदी चित्रपट 'दंगल' ह्या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका बजावली होती, 

V_SHANTARAM_RANGOLI.JPGP1040703.JPGP1040725.JPG
प्रवेशद्वाराजवळ सिनेसृष्टीचे पितामह 'व्ही शांताराम' ह्यांच्या रांगोळीने प्रेक्षकांचे स्वागत करण्यात आले. हा महोत्सव पाहण्यासाठी बांगलादेश, इराण, इराक आणि भारताच्या कानाकोप-यातून आलेल्या स्पर्धक तसेच प्रेक्षकांनी एकच गर्दी केली होती. सामाजिक जनजागृती शॉर्ट फिल्म (सोशल अवेरनेस), आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म (विदेशी फिल्म), अॅनिमेशनपट, कल्पनारम्य (फिक्शन) फिल्म, जाहिरातपट (अॅडफिल्म), संगीतपट (म्युझिक व्हिडियो) आणि माहितीपट (डॉक्युमेंटरी) अश्या विविध प्रकारच्या फिल्म्सचा मनमुराद आनंद प्रेक्षकांनी लुटला. या तीन दिवसीय महोत्सवात लघुपटकारांसाठी पॅनल डिस्कशन, स्क्रिप्टिंग वर्कशॉप, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, चित्रपटसृष्टीतले तज्ञ, प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्मात्यांशी चर्चा आणि प्रश्नोतरे यासारख्या कार्यक्रमांची मेजवानी अनुभवयास मिळाली. महोत्सवात १५ वर्षाच्या नवोदितापासून ते ६५ वर्षाच्या अनुभवी लघुपटकारांपर्यंत सर्वांनी सहभाग घेतला होता. या महोत्सवाला नामवंत स्पर्धकांचा हि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 

PANEL_DISCUSSION.JPGP1040487.JPG
ओपन माईंड प्रोडक्शन ह्या संस्थेच्या सहयोगाने सिनेसृष्टीतील लेखकांसाठी तेजस्विनी पटवर्धन यांचे स्क्रिप्ट रायटिंग वर मार्गदर्शन केले. 'प्रभात चित्र मंडळ' यांच्या सहयोगाने 'लघुपट निर्मिती आणि आर्थिक नफा' ह्या विषयावर पॅनल डिस्कशनचे आयोजन करण्यात आले होते. ह्या कार्यक्रमात सिनेसृष्टीतील मान्यवर तज्ज्ञ समीर मोदी, वेदांती दाणी, वेद रवतानी यांचे मार्गदर्शन लाभले. 'प्रभात चित्र मंडळ' च्या अमित चव्हाण ह्यांनी ह्या कार्यक्रमाचे यजमानपद भूषविले. तंत्रमार्गदर्शन कार्यशाळेत नूरआलम शेख यांनी सिनेसृष्टीतील कलाकार-तंत्रज्ञासाठी उपयुक्त असलेल्या फ्लिक्समेट्स ह्या एप्लिकेशनचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.

P1040498.JPGP1040534.JPG

ज्येष्ठ दिग्दर्शक राज दत्त ह्यांनी महोत्सवाचे उद्घाटन केले तर महोत्सवातील पारितोषिक वितरण सोहळ्यात सिनेसृष्टीतल्या दिग्गजांची उपस्थिती लाभली.  रामायण ह्या पौराणिक मालिकेतील 'सीता' फेम 'दीपिका चिखलीया टोपीवाला'आणि महाभारत ह्या पौराणिक मालिकेतील 'मै समय हू' फेम 'हरीश भिमानी' ह्या वेळेला सोहळ्यात उपस्थित होते. त्यामुळे रामायण आणि महाभारत एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. रितंभरा विश्व विद्यापीठ चे अध्यक्ष श्री अश्विनभाई मेहता, विश्वस्त किशोरभाई संघवी, एमकेएस कॉलेज च्या प्रिंसिपल डॉ. कृष्णाबेन गांधी, फेस्टिवल ज्युरी हेड प्रा. चेतन माथूर,गुजराती 'नटसम्राट' चित्रपटाचे दिग्दर्शक 'जयंत गिलाटर', लाफ्टर चेलेंज फेम हास्य अभिनेता 'नवीन प्रभाकर', जाहिरात क्षेत्रातील नामांकित अभिनेता 'कांचन पगारे' ह्या सर्व मान्यवरांनी फेस्टिवलमध्ये विशेष उपस्थिती दिली आणि विजेत्यांना पारितोषिके आणि प्रशस्तिपत्रक देऊन गौरविले. लघुपट परीक्षणासाठी फेस्टिवल ज्युरी हेड म्हणून प्रा. चेतन माथूर यांनी तर ज्युरी म्हणून गोविंद शर्मा, डॉ. कुंदा प्रमिला नीलकंठ, प्रदीप गुप्ता, हेमंत संगानी, व्हेनिस संघवी, बॉबी वत्स, प्रा. संदीपा चटर्जी, निशिकांत सदाफुले यांनी काम पहिले, तसेच प्रीव्युव्ह  कमिटी मध्ये शशिकांत गवळी, प्रशांत कदम, कुणाल देशपांडे, रेशमी नायर, दत्ता व्हरावडेकर, सुनील भोर, नेहल मणियार, ओंकार सावर्डेकर यांनी काम पहिले.  'युनिव्हर्सल मराठी'चे अजित जाधव, अमितराज निर्मल, परेश कदम आणि रुपेश दळवी ह्यांनी महोत्सवाच्या आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली. महोत्सवाला अनघा पीआर चे उन्मेष चौधरी, फ्लिक्समेट्स चे नूरआलम शेख, युनिव्हर्सल पीस चे मन्सूर येझदी, अनंत केटरर्स चे नागेश वंजारे ह्यांचे विशेष सहकार्य लाभले.


|वर्गवारी नुसार पारितोषिके|

सामाजिक जनजागृती : टुलेट (दिग्द. योगेश खंडाळे) 
माहितीपट : दि गर्ल्स आर नॉट ब्राइड्स (दिग्द. केम ताज-बिऊल हसन) 
म्युझिक व्हिडिओ : त्या सांज किनाऱ्यापाशी  (दिग्द. कृणाल राणे) 
कल्पनारम्य (फिक्शन) फिल्म : शमशान (दिग्द. बिट्टू कुमार) 
जाहिरातपट : कॅरी ऑन  (दिग्द. सुमीत पाटील) 
ऍनिमेशनपट : गॉड डॅम  (दिग्द. अमेय पितळे) 
आंतरराष्ट्रीय :  कलर केज (दिग्द. डॅनियल रेअस्कॉस) 
स्पेशल ज्युरी : समीरा (दिग्द. स्वाती सेमवाल), प्रॉन्स (दिग्द. स्वप्नील शेट्ये)   

|सोशल-फिक्शन विभागातील वैयक्तिक पारितोषिके|

सर्वोत्कृष्ट लेखन : किरण विजय साष्टे (शॉर्टफिल्म : लाडू)
सर्वोत्कृष्ट संगीत : बहराम, टिनू अरोरा, झुबीन कठोर (शॉर्टफिल्म : समीरा) 
सर्वोत्कृष्ट संकलन : राहुल दासवानी (शॉर्टफिल्म : टू रिमेम्बर मी बाय)
सर्वोत्कृष्ट छायांकन : अमित घाडीगावकर (शॉर्टफिल्म : प्रॉन्स) 
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन :  योगेश खंडाळे (शॉर्टफिल्म : टू लेट)
सर्वोत्कृष्ट अभिनेता : रित्विक सहोरे (शॉर्टफिल्म : टू रिमेम्बर मी बाय)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : हिमानी त्यागी (शॉर्टफिल्म : १८+ त्रिशा)

|डॉक्युमेंट्री विभागातील वैयक्तिक पारितोषिके|
सर्वोत्कृष्ट लेखन : ओवेद गडकर (डॉक्युमेंट्री : दि अंडरग्राऊंड एजेंट)
सर्वोत्कृष्ट छायांकन : किशोर देवरे आणि श्रीनिवास गायकवाड (डॉक्युमेंट्री : फड) 
सर्वोत्कृष्ट संकलन : विशाल सुवल्का (डॉक्युमेंट्री : डीजेबल टू डिफरेंट एबल)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन : अरुण काशीद (डॉक्युमेंट्री : स्वच्छता दूत)
______________












महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments