शिवक्रांती संघटनेचा अनोखा उपक्रम... 201 जणांनी रक्तदान शिबीर घेऊन वीर शहीदांना वाहिली श्रध्दांजली

पंढरपूर LIVE 27 नोव्हेंबर 2018


पंढरपूर (प्रतिनिधी):- आज दि. 26-11-2018 रोजी येथील शिवक्रांती युवा संघटनेने भव्य रक्तदान शिबीर घेऊन वीर शहीदांना श्रध्दांजली अर्पण केली. ‘‘शहीदांचे स्मरण करताना व त्यांना अभिवादन करताना आपल्या रक्ताचा कांही अंश गरजवंतांना उपयोगी पडावा.’’ हा उदात्त हेतु नजरेसमोर ठेवुन शिवक्रांती सामाजिक संघटनने आज शहीद दिनानिमित्त राबविलेल्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक  राजेश गवळी यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवरांनी केले. 

मातोश्री मीराबाई महाराज मठ, झेंडे गल्ली, पंढरपूर येथे आज सकाळी 10 वाजता पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक  राजेश गवळी व तेलंगणा येथील उद्योजक लहुकुमार यांचे शुभहस्ते वीर शहीदांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यानंतर रक्तदान शिबीर भरविण्यात आले. शिवक्रांती युवा संघटनेकडून कांही दिवसापुर्वी केलेल्या आवाहनाला रक्तदात्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला. तब्बल 201 जणांनी यावेळी रक्तदान केले. यावेळी श्री.गवळी यांनी सर्व रक्तदात्यांचे व शिवक्रांती संघटनेच्या पदाधिकार्‍यांचे कौतुक करुन असेच कार्य करत रहाण्यासाठी प्रोत्साहन दिले.

यावेळी पंढरपूर ब्लड बँकेचे प्रसाद खाडीलकर, सागर जाधव, महेश हाके, किशोर वायदंडे, अनिल हाके, विशाल  लोखंडे, राझिया नदाफ, सौ.उपाध्ये आदींसह  शिवक्रांती युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय काळे, सल्लागार अजिंक्य शिंदे, जिल्हा संघटक नागेश नरळे, तालुकाध्यक्ष समाधान देठे, तालुका संघटक राहुल कदम, शहर अध्यक्ष सागर चव्हाण, शहर कार्याध्यक्ष सोपानकाका देशमुख, शहर संघटक विठ्ठल काळे, माऊली चव्हाण, रवि गोरे, वामन पवार, रंजीत सावंत, राकेश मोरे,  नंदकुमार मुजमुले, आदित्य लोखंडे, सोमा देवकर, केशव पवार आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


    














महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments