नरेंद्र मोदी विचार मंच व भीमरत्न कला क्रीडा सांस्कृतीक मंडळाच्या वतीने संविधान दिन साजरा

पंढरपूर LIVE 27 नोव्हेंबर 2018



पंढरपूर (प्रतिनिधी):- आज दि. 26-11-2018 रोजी नरेंद्र मोदी विचार मंच व भीमरत्न कला क्रीडा सांस्कृतीक मंडळाच्या वतीने गाताडे प्लॉट, पंढरपूर येथे संविधान दिन साजरा केला. यावेळी नरेंद्र मोदी विचार मंचच्या (लघु उद्योग विकास) सोलापूर जिल्हाध्यक्षा सौ. आरती ओंकार बसवंती व पंढरपूर न.प. च्या माजी उपनगराध्यक्षा सौ. शैलजा बाळासाहेब कसबे यांच्या शुभहस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यानंतर संविधानाचे सामुहिक पठण करण्यात आले. भारतीय संविधानाचे पालन व रक्षण करण्याची प्रतिज्ञा यावेळी उपस्थित सर्वांनी घेतली.

यावेळी बोलताना सौ.बसवंती म्हणाल्या की, ‘‘आजच्याच दिवशी आपली हजारो वषाची गुलामी नष्ट झाली. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेकर यांच्या संविधानामुळे ही गुलामी नष्ट झाली. खरं तर हा आपणा सर्व भारतीयांसाठी गौरव दिन आहे. जर संविधान नसते तर आपण कायम  गुलामीच्या जोखडात अडकुन खितपत पडलो असतो. जर पुन्हा गुलामीच्या जोखडात अडकायचं नसेल तर संविधान टिकवण्यासाठी प्रयत्न करुयात.’’ 

यावेळी सौ.कसबे म्हणाल्या की, ‘‘आज आपण सर्व महिला भगिणी समाजात ज्या ताठ मानेने वावरुय शकतात व स्वबळावर सर्वच क्षेत्रात दैदिप्यमान कार्य करु शकत आहोत याचे सर्व श्रेय भारतीय संविधानाला आहे. व याचा आम्हाला नितांत अभिमान आहे. सर्व भारतीयांनाही याचा अभिमान वाटायलाच हवा.’’

यावेळी रि.पाई.चे पश्‍चिम महाराष्ट्र संघटक मा.नगरसेवक बाळासाहेब कसबे, नरेंद्र मोदी विचारमंच्या जिल्हा संघटक बायडाबाई हणमंत पाटोळे, शहर उपाध्यक्षा मंदाकिनी भारत मुळे, तालुकाध्यक्षा उल्का लटके, ओ.बी.सी. अध्यक्षा मंगल मारुती पाटोळे, तालुका उपाध्यक्षा वैशाली धोत्रे, आर.पी.आय. च्या महिला कार्यकर्त्या उषा कसबे, शोभा कसबे, प्राजक्ता गायकवाड, रेहना पटेल, जयश्री झेंडे, दिलशाद पटेल,संजय खराडे आदींसह अनेक महिला भगिणी उपस्थित होत्या.


    














महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments