पंढरपूर LIVE 25 नोव्हेंबर 2018
पंढरपूर (प्रतिनिधी):- राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या 128 व्या स्मृतीदिनानिमित्त साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे युवक संघटनेच्या वतीने दि. 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विठ्ठल इन सभागृह, पंढरपूर येथे समाजप्रबोधन शिबीराचे आयोजन केले आहे.
सर्वच आघाड्यावर मातंग समाजाची पीछेहाट झाली असून वैचारीकदृष्टया समाज संभ्रमावस्थेत आहे. त्यामुळे शत्रु कोण व मित्र कोण? हे व आपले हीत कशात? हे समजण्यासाठी वैचारीक मंथन होणं गरजेचे आहे हे ओळखून या शिबीराचे आयोजन केले आहे. अशी माहिती माजी नगरसेवक अंबादास वायदंडे व सोनबा वाघमारे यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे. या शिबीरात उद्घाटन सत्र, परिसंवाद, चर्चासत्र व समारोप असे सत्र आहेत. या शिबीराचे उद्घाटन राष्ट्रीय लोकशाही लढा या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय लोखंडे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या व गणराज्य महिला संघटनेच्या मराठवाडा अध्यक्ष जोशीलाताई लोमटे या असणार आहेत. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये सचिन साठे, मानवहित लोकशाही संघटना सांगली, दिलीपराव देवकुळे, प्रदेशाध्यक्ष डी.एस.एस., नानासाहेब वाघमारे, जिल्हा सल्लागार ए.एस.यु.एस., प्रा.डॉ.किशोर खिलारे (विचारवंत कोल्हापूर), संजीव खिलारे (संस्थापक अध्यक्ष दलित महासंघ), श्रीधर जाधव (बहुजन वंचीत आघाडी पुणे), ज्ञानदेव खंडागळे (आरपीआय मातंग आघाडी प.महाराष्ट्र अध्यक्ष), राजाभाऊ खिलारे (निमंत्रक, बहुजन समता पार्टी) यांचा सहभाग आहे.
दुसर्या सत्रात परिसंवादाचे आयोजन केले असून ‘‘मातंग समाजाची आजची दशा व उद्याची दिशा’’ या विषयावर प्रा.डॉ.मिलींद आव्हाड (अभ्यासक-जे.एन.यु. दिल्ली), रमेश राक्षे (सामाजिक कार्यकर्ते पुणे), प्रा.डॉ.शरद गायकवाड (जेष्ठ विचारवंत कोल्हापूर), अजिंक्य चांदणे (प्रदेशाध्यक्ष डी.पी.आय. बीड), प्रबुध्द साठे (संस्थापक-प्रजासत्ताक जनता परिषद, पुणे), मा.धो.खिलारे (जेष्ठ अभ्यासक नाशिक) हे आपले विचार व्यक्त करणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्रीकांत कसबे (संपादक, सा.जोशाबा टाईम्स, पंढरपूर) हे असणार आहेत.
तिसरे सत्र हे चर्चासत्र असून यामध्ये सर्व समुह व प्रमुख मान्यवर यांची विविध विषयावर चर्चा होणार असून या सत्राचे अध्यक्षस्थानी युवराज पवार, संस्थापक परिवर्तन बहुउद्देशीय संस्था सोलापूर हे आहेत. शेवटी समारोपसत्र प्रा.डॉ.रामदास नाईकनवरे (कार्य.संपादक सा.जोशाबा टाईम्स, पंढरपूर) यांचे अध्यक्षतेखाली होणार आहे. तरी समाजातील बुध्दीजीवी व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन करण्यात आले आहे. शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रा.दत्तात्रय खिलारे, प्रा.रविंद्र रणदिवे, कबीर देवकुळे, समाधान वायदंडे, कृष्णा वाघमारे, किशोर खिलारे, तानाजी रणदिवे, अर्जुन खिलारे, सत्यवान देवकुळे, महेश साठे (माजी नगरसेवक) आदी कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
0 Comments