पंढरपुरात भाजपाच्या वतीने ‘शौर्य दिना’निमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन.. सर्व शाळा, महाविद्यालयांनी सहभागी होण्याचे आवाहन

पंढरपूर LIVE 27 नोव्हेंबर 2018


पंढरपूर (प्रतिनिधी) : 29 नोव्हेंबर हा पंढरपूरकरांच्या जीवनातील अभिमानाचा दिवस. यादिवशी पंढरपूरचा सुपूत्र मेजर कुणाल गोसावी याने जम्मू काश्मिरच्या नगरोटा येथे अतिरेक्यांशी झुंज देत असताना त्याला भारतमातेच्या रक्षणार्थ वीरमरण प्राप्त झाले. हा दिवस भारतीय जनता पार्टी पंढरपूर शहरच्या वतीने ‘शौर्यदिन’ म्हणून पाळणार असल्याचे भाजपाचे शहराध्यक्ष संजय वाईकर यांनी जाहीर केले आहे.


    त्यास अनुसरून गुरूवार दि. 29 नोव्हेंबर 2018 रोजी कुणालच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये राष्ट्रभक्तीपर निबंध स्पर्धांचे आयोजन केले आहे. 
या स्पर्धेमध्ये ‘व्यर्थ न हो कुणाल का बलिदान’ व ‘भारतमातेसाठी माझी भूमिका’ हे दोन विषय देण्यात आले आहेत. या दोन विषयांवर फुलस्केप पानावर 300 शब्दांपर्यंत आपले कुणालबद्दलचे विचार ‘व्यर्थ न हो कुणाल का बलिदान’ या विषयावर तसेच ‘भारत मातेसाठी माझी भूमिका’ या विषयावर लिहून शाळेतच प्रत्येक विद्यार्थी- विद्यार्थिनींने द्यावयाचे आहेत.


यामधील चांगल्यात चांगल्या निबंध लिहिणार्‍या विद्यार्थी-विद्यार्थिनीचा यथोचित सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असून त्या विद्यार्थ्याला भारतमातेच्या चित्रामध्ये वसविलेली कुणालची प्रतिमा भेट म्हणून शहर भाजपच्या वतीने देण्यात येणार असल्याचे शहराध्यक्ष संजय वाईकर यांनी जाहीर केले आहे. तरी या निबंध स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभागी होऊन आपले देशप्रेम शब्दबद्ध करावे, असे आवाहन पंढरपूर शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष संजय वाईकर यांनी केले आहे.
मागील वर्षी कुणाल गोसावींच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त सर्व शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, सावरकर पथावरून शिवाजी चौक, चौफाळा, गोपाळकृष्ण मंदिर, गांधी रोड, नाथ चौक, भजनदास चौक, तांबडा मारूती, महाद्वार चौक, विजापूर गल्ली, कालिका मंदिरमार्गे काळ्या मारूतीपासून चौफाळ्यामध्ये स्वाभिमानी रॅली काढून कुणालला मानवंदना दिली होती. त्याच पद्धतीने यावर्षी शब्दबद्ध रूपाने कुणालला मानवंदना द्यावयाची आहे.











महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments