‘आनंदाची वारी...आली पंढरीच्या दारी’ अनाथ बालके व निराधार वयोवृध्दांना घडवली पंढरीची आनंदवारी... ‘इंदापूर येथील युवा क्रांती प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम’

पंढरपूर LIVE 25 नोव्हेंबर 2018 


पंढरपूर (प्रतिनिधी):- इंदापूर येथील युवा क्रांती प्रतिष्ठान यांचे वतीने आज श्रावणबाळ बालकाश्रम (इंदापूर), माऊली बालकाश्रम (इंदापूर) येथील अनेक अनाथ बालकांना व गोविंद वृध्दाश्रम (टेंभुर्णी) येथील अनेक निराधार वयोवृध्दांना पंढरीची आनंदवारी घडविण्यात आली. 


पंढरीची वारी एकदा तरी घडावी अशी प्रत्येक अबालवृध्दांची असते. आज या आनंदवारीच्या रुपाने मिळालेला आनंद प्रत्येक बालकाच्या व वयोवृध्दांच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहताना आढळत होता. विठोबाच्या पायी लीन होण्याची इच्छा पुर्ण झाल्याने धन्य झालो. अशी प्रतिक्रिया एका आजोबांनी दिली तर कैकाडी महाराज मठातील मोठ-मोठ-मोठ्या देवदेवतांच्या मुर्ती पाहुन आश्‍चर्य वाटले. बर्‍याच दिवसांनी आज इथं आल्यानंतर मज्जा वाटली. अशी प्रतिक्रिया एका चिमुरडीने व्यक्त केली. दररोजच्या रुटीनचा कंटाळा प्रत्येकालाच येतो. कुठं तरी फिरायला जावं, वेगळी दुनिया बघावी, देवदर्शन घ्यावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. मग अशीच इच्छा या बालकांना व वयोवृध्दांना होत नसेल का? अशा विचार करुन आम्ही गेल्या वर्षापासून ‘आनंदवारी’ ही संकल्पना राबवित आहोत. गेल्या वर्षी येथील बालकांना व वयोवृध्दांना आळंदीची आनंदवारी घडविली व यावर्षी पंढरीची आनंदवारी घडवित आहोत. अशी माहिती युवा क्रांती प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष प्रशांत सिताप यांनी दिली. 

आनंद वारीसाठी जिजाऊ नर्सिंग स्कुल, पंढरपूर चे संस्थापक अध्यक्ष जयंत नायकुडे यांनी आरोग्यसेवा पुरवली. पंढरीत आल्यानंतर कैकाडी महाराज मठाचे ह.भ.प. रामदास महाराज जाधव, माजी नगराध्यक्ष लक्ष्मणभाऊ शिरसट, पीएसआय सत्यजित अधटराव, समाजसेवक दत्ता काळे, सतीश घंटे, बाळासाहेब क्षिरसागर, डॉ.दादासाहेब नागणे आदींचेही मोलाचे सहकार्य लाभल्याची माहिती श्री.सिताप यांनी दिली.
  आज दुपारी पंढरीत दाखल झालेली ही आनंदवारी कांही क्षण कैकाडी महाराज मठामध्ये विसावली. यानंतर चंद्रभागेच्या पात्रातील तिर्थ घेऊन श्रीविठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अन्नक्षेत्रात सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यानंतर पंढरीची नगरप्रदक्षिणा करत पंढरी दर्शन घेतले. विविध वस्तुंची खरेदी केली व कैकाडी महाराज मठ पाहिला. कैकाडी महाराज मठातील सांस्कृतीक भवन मध्ये सर्व मुलांना जादुगार सुर्यकांत चव्हाण यांचे जादुचे दाखविण्यात आले. यावेळी शिवक्रांती_ युवा संघटन, पंढरपूर यांच्या वतीने सर्वांना फलाहाराचे वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेवक विक्रम शिरसट, शिवक्रांतीचे संस्थापक-अध्यक्ष दत्तात्रय काळे, शहराध्यक्ष सागर चव्हाण, शहर कार्याध्यक्ष सोपानकाका देशमुख आदींसह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते. 
35 अनाथ मुले व 15 वयोवृध्दांच्या या आनंदवारीमध्ये सहभागी झालेले बालकाश्रमाचे संचालक राजीव करडे, वृध्दाश्रमाचे संचालक दशरथ महाराज महाडीक, धरमचंद लोढा, डॉ. संजय शिंदे, पियुष बोरा, अस्लम शेख, अक्षय खरात, दत्ता हुले, सचिन परबते व राजमाता जिजाऊ नर्सिंग स्कुल इंदापूरच्या कांही विद्यार्थिनींनी ही आनंदवारी सफल होण्यासाठी विशेष प्रयत्न केले. 


    
















महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments