भव्य नोकरी महोत्सव २०१८ चे उद्घाटन...मुलाखतीस आलेल्या 2500 तरुण-तरुणींपैकी 1300 जणांना जाग्यावरच दिले ऑफर लेटर! दिलेला शब्द पाळला : समाधान आवताडे

पंढरपूर LIVE 25 नोव्हेंबर 2018   


श्री संत दामाजी साखर कारखाना मंगळवेढा चेअरमन समाधान दादा ) आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नोकरी महोत्सव २०१८ या समारंभाचे उद्घाटन मा. श्री.  ह भ प बद्रीनाथ तनपुरे महाराज पंढरपूर यांच्या शुभहस्ते व प्रमुख पाहुणे .डॉ. सागर कवडे (उपविभागीय पोलिस अधिकारी) पंढरपूर तसेच पंढरी संचार  संपादक बाळासाहेब बडवे, सभापती समाज कल्याण जि. प. सोलापूर मा. सौ. शीलाताई शिवशरण,  इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले.

 श्री. आवताडे यांनी आजच्या या नोकरी महोत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या युवक-युवतींचे प्रथमत: स्वागत केले. आणि त्यांना समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींची संख्या निदर्शनास आली. याच बरोबर पंढरपूर येथील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळी त्यांना पंढरपूर शहरातील व तालुक्यातील बेरोजगार तरुणांची संख्या खूपच आहे असे जाणवले म्हणून त्यांच्यासाठी काहीतरी करायचे असे त्यांना वाटले म्हणून बेरोजगार तरुण-तरुणींच्या हाताला काम देण्यासाठी आज २५ नोव्हेंबर २०१८ रोजी  या भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन केले आहे.  

  श्री. आवताडे म्हणाले की,  " या समाजामध्ये  फक्त राजकारण किंवा अर्थकारण करून चालणार नाही  तर त्याला समाजकारणाची जोड असली पाहिजेत्यांनी आलेल्या सर्व  कंपन्यांना विनंती केली की, किमान आज रोजी १००० उमेदवारांना नोकरी द्यावी आणि ज्या  युवक व युवतींना आज नोकरी मिळाली नाही त्याने निराश न होता नव्या जोमाने पुढील इंटरव्यू ला हजर व्हावे. किंवा एक स्वतःचा उद्योग सुरू करावा. यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, नव्या जोमाने स्वतःचा उद्योग सुरू करावा त्यासाठी सहकार्य माझे राहील." असे आश्‍वासन यावेळी त्यांनी दिले. 



    आज आपण पाहतो शिक्षण क्षेत्रामध्ये आमुलाग्र बदल झालेले आहेत. शिक्षण क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धेमध्ये जो अतोनात परिश्रम करतो तोच यशाचे शिखर गाठतो यामध्ये टिकून राहण्यासाठी कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही म्हणून तरुणांनो जागे व्हा आणि स्वतःचा एक उद्योग सुरु करा.  शिक्षणाच्या पदव्या घेऊन आज तरुणांचे लोंढे बाहेर पडत आहेत शासन या सर्वांना नोकरी नोकऱ्या देऊ शकत नाही यामुळेच युवकांनी नोकरीच्या प्रयत्न करीत असताना उद्योगाकडे व येणे ही काळाची गरज झालेली आहे  आजचा तरुण हा दिशाहीन झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये या युवकांना योग्य दिशा दाखवून त्यांनी जीवनाची नवी पहाट दाखवण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे अशा प्रकारच्या नोकरी महोत्सवाच्या आयोजनामुळे ही संधी सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींना निर्माण झालेली आहे या संधीचं त्यांनी सोनं करावं  आपल्या मुलांना नोकरी मिळावी घरचे दारिद्र्य संपुष्टात यावे आयुष्याची संध्याकाळचे चार घास सुखाचे खाता यावे असे प्रत्येक आई वडिलांचे स्वप्न असते तर त्यांच्या परिश्रमाचे फळ देणे हे तुमचे सर्वांचे कर्तव्य आहे  आजच्या या नोकरी मेळाव्यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहेजवळपास साडेतीन हजार अर्ज झालेले आहेत आणि आज नवीन नोंदणी मिळून पाच हजार तरुण-तरुणींनी या भव्य नोकरी महोत्सवास भाग घेतला आहे  या नोकरी महोत्सवामध्ये अनेक नामवंत कंपन्यामारुती सुझुकी नव भारत फर्टीलायझर बी एस ए कार्पोरेशन यशस्वी ग्रुप टाटा स्ट्राईव्ह मिंडा कार्पोरेशन युरेका फोर्स आय सी आय सी सार्थक एज्युकेशन पे आशिया एम डी टी ए भारत फोर्जे  एल आय सी, टी व्ही एस फायनान्स,कावासाकी प्रिस्तीने आयुर  एस एम  आवताडे प्रायव्हेट लिमिटेड आवताडे स्पिनर्स आवताडे शुगर श्री संत दामाजी साखर कारखाना मंगळवेढा या ठिकाणी आलेले आहेत उमेदवाराची शैक्षणिक पात्रता गुणवत्ता अनुभव याचे अवलोकन करून आपणास  संधी मिळणार आहे जीवनामध्ये काही गमवल्याशिवाय काहीतरी कमवता येत नाही तुम्ही स्वतः मनाशी याचा विचार करा मी स्वतः तीन-चार बेरोजगार तरुण तरुणींना नोकरीची संधी उपलब्ध करून देईन आणि खरंतर लोकांना नोकरी लावण्याचे साखळी बांधली पाहिजे आपल्या पंढरपूर तालुक्यामध्ये एम आय डी  सी होणे गरजेचे आहे  कारण पंढरपूर परिसरातील वातावरण हे उद्योजक आणि उद्योगाला पोषक आहे या ठिकाणी असणारी जमीन, पाणी, रेल्वे, रस्ते व इतर सर्व गोष्टी उपलब्ध आहेत म्हणून भविष्यामध्ये आपण पंढरपूर तालुक्यासाठी एम आय डी  सी आणू व छोटे-मोठे उद्योग उभारून  सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणीच्या हाताला  काम देणार आहोत आणि म्हणून यापुढील काळात ही आपल्यासाठी नोकरीची संधी असू द्या स्वयंरोजगारासाठी मदत असुद्या याबाबत मी सतत आपल्या पाठीशी राहील अशी याप्रसंगी त्यांनी ग्वाही दिलीयेणाऱ्या  काळामध्ये सर्व तरुण-तरुणींना त्यांनी याप्रसंगी शुभेच्छा दिल्या


ह भ प बद्रीनाथ तनपुरे महाराज यांनी या नोकरी महोत्सवाचे उद्घाटन प्रसंगी बोलताना त्यांनी पुंडलिका वरदा हरी विठ्ठल या जयघोषाने मनोगत सुरू केले आणि सुरुवातीस ते असे म्हणाले की  आवताडे साहेब मला याप्रसंगी समाधान वाटले मी जरी संत नसलो तरी संताचा पाईक आहे हा प्रसंग बोलण्याचा कार्यक्रम नाही येथे आलेला जी  काही  5000 10000 मुला मुलांची उपस्थिती आहे. या देशांमध्ये तरुणींची तरुण-तरुणींची लोकसंख्या जास्त आहे आणि या देशांमध्ये तरुणांची दशा एखाद्या भिकाऱ्या प्रमाणे आहे इतर देशांच्या मानाने सध्याची लोकसंख्या आपल्या देशामध्ये जास्त आहे 500 वर्षानंतर एक शिवाजी जन्माला येतो त्याचे नाव समाधान आवताडे हे कोणत्या पक्षाचे आहेत किंवा याची स्तुती करण्यापेक्षा ज्यांनी बोलणं संभाळलं त्यांनी जग जिंकले मी केलेल्या विचाराचे शब्द लिहिले पाहिजेत खालच्या ला किती हात दिले द्यावे याचा विचार केला पाहिजे आपली जी कारकीर्द  आहे ती शेवटच्या चरणापर्यंत केली पाहिजे. सगळे एकाच पंक्तीला बसले पाहिजेत दहा लाख पन्नास लाख आपण डॉक्टर इंजिनिअर हे शिक्षण घेण्यासाठी घालतो पण एक रुपया मिळवायची ताकद आजच्या तरुणांमध्ये नाहीये म्हणून महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी ठिकाणाहून आलेल्या जो आजचा तरुण तरुणी आहे ती आज रिकाम्या हाताने परत जाणार नाही ते समाधानी होऊन परत जाणार आहेत ही सगळी शेतकऱ्यांची मुला आहेत ती नोकरी काम घेऊन परत जाणार आहेत आणि ही बेकारी संपुष्टात आणण्यासाठी मा श्री समाधान (दादा)अवताडे यांनी हा नोकरी महोत्सव आयोजित केला आहे याप्रसंगी हे सर्व तरुण-तरुणी समाधानी होणार आहेत या तरुण-तरुणींना ते बोलतात साष्टांग दंडवत विसरू नका या क्षणाला असे आवाहन आलेल्या लोकांनी लोकांना त्यांनी केले



उपविभागीय पोलिस अधिकारी पंढरपूर डॉ. सागर कवडे यांनी जमलेल्या सर्व तरुण-तरुणींना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली म्हणून समाधान दादा अवताडे यांचे आभार मानले आणि तरुणांना असा सल्ला दिला की आपण जे शिक्षण घेतला आहे त्याच तुम्ही आणि समाधान (दादा) अवताडे यांनी तुम्हाला जी नोकरी महोत्सव निमित्त जी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली त्या संधीचं सोनं करा असं त्या ठिकाणी बोलले
माजी जिल्हा उपाध्यक्ष भाजपा चे दत्त माननीय श्री दत्तात्रेय जमदाडे सर यांनी आपल्या भाषणातून पंढरपूर तालुक्यात असणारे गरजा  अडचणी मांडल्या व समाधान (दादा) आवताडे यांना भावी राजकीय कारकिर्दीत शुभेच्छा दिल्या.


दैनिक पंढरी संचार चे संपादक मा श्री बाळासाहेब बडवे यांनी समाधान दादा अवताडे यांना भावी राजकीय कारकीर्द शुभेच्छा दिल्या याप्रसंगी बोलताना ते म्हणाले ते दादा तुम्ही आमदार व्हावे अशी विठ्ठला चरणी प्रार्थना केली आणि पंढरपूरचा विकास करा आणि या ठिकाणी आलेल्या जो तरुण-तरुणी आहेत त्यांना आज या ठिकाणी नोकरी मिळणार आहे
माजी नगराध्यक्ष पंढरपूरचे सुभाष दादा भोसले यांनी प्रथमतः पंढरपूरकर यांच्या वतीने मान्यवरांचे स्वागत केले. समाजकारण-राजकारण आणि पंढरपूरच्या युवकाची परिस्थिती त्यांनी डोळ्यासमोरून घेतली पंढरपूरच्या या भव्य नोकरी महोत्सवासाठी आत्तापर्यंत पंढरपूरच्या नेत्यांनी कोणीही काही केले नाही ही खंतही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली म्हणून पंढरपूर शहर व पंढरपूर तालुका यातील तरुण-तरुणींना हाताला काम जर मिळायचा असेल तर समाधान (दादा) आवताडे हे एम आय डी  सी आपल्या भागामध्ये आणून रिकाम्या हाताला काम काही लोकांना रोजगार देणार आहेत व कंपनीचे संपर्क साधून त्यांना नोकरी देणार आहेत आणि त्यांचा मूळ उद्योग कॉंक्रीटचा आहे म्हणून ते आपलं काम सुद्धा काँक्रेट करणार आहेत पुढे ते असे म्हणाले की समाधान (दादा) तुम्ही नशीबवान आहे की तुमची टीम अतिशय परिश्रम घेणारे आहे आणि त्यामुळे तुम्ही हे सगळं करू शकता तुमच्या पुढील कारकिर्दी राजकीय कारकीर्दीत यशदायी उज्वल होवो अशी त्यांनी पांडुरंगा चरणी प्रार्थना केली या कार्यक्रमासाठी राजरत्न बाबर राजकुमार शहापुरकर दिनेश खंडेलवाल माऊली डांगे विशाल मिसाळ विक्रांत पंडित आधी पत्रकार उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली



या कार्यक्रमासाठी शेखर भाऊ भोसले हनुमंतराव शेळके सिद्धेश्वर आवताडे जे के   गायकवाड मुकेश कदम प्रदीप खांडेकर अरविंद जाधव मोहम्मद मुलाणी   कृष्णा वाघमारे सुभाषभाऊ यादव येताळा  भगत सर संजय माळी सर अमिन शेख बबन पाटील बालाजी जाधव योगेश कांबळे महेश चव्हाण अनिल कांबळे प्रकाश पवार पिंटू कुसुंबे सुधाकर फाटे शांतीनाथ  बागल मोहन बागल पद्माकर बागल तानाजी नागटिळक परमेश्वर पाटील पांडुरंग करकमकर अमोल धोत्रे अनिल मस्के सागर आटकळे  सदाअण्णा मस्के  पांढरे मेंबर सुनील गायकवाड संजय अभंगराव तुकाराम वासू कर किसन पवार संतोष मोरे लियाकत मुजावर तसेच दामाजी कारखान्याचे संचालकसुरेश भाकरे रामकृष्ण चव्हाण लक्ष्मण तात्या जगताप संजय पवार शिवगयोअप्पा पुजारी सचिन शिवशरण प्रमोद माने सूर्यकांत ढोणे    शिरा कवठेकर सिद्धेश्वर पाटील पिंटू कुसूमडे पांडुरंग आसबे विठ्ठल लवटे महाराज संतोष कवडे आदी कार्यकर्ते उपस्थित  होते
सदरचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी समाधान (दादा) युवामंच पंढरपूर व मंगळवेढा येथील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक उन्हाळे सर यांनी केले व प्रास्ताविक मुन्ना मलपे तसेच जमदाडे सर यांनी केले व आभार विनोदराज लटके यांनी मानले



महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments