माजी सैनिकांनी समस्याबाबत कल्याण विभागाशी संपर्क साधावा... रसेल डिसूझा यांचे आवाहन

पंढरपूर LIVE 25 नोव्हेंबर 2018






पंढरपूर, दि.25-   देशसेवा करुन आलेल्या माजी सैनिकांना  तसेच  माजी सैनिक पत्नी व  अवलंबिताचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी संबधित सैन्यातील अधिकाऱ्यांशी व जिल्हा सैनिक कल्याण विभागाशी संपर्क साधवा, असे आवाहन  मेकॅनाईज्ड इन्फट्री रेजिमेंटल सेंटरचे डेप्युटी कमांडिंग  ऑफिसर रसेल डिसुझा यांनी केले.
        माजी सैनिकांच्या समस्यांचे निराकरण व योजनांची माहिती मिळण्यासाठी पंढरपूर, इसबावी  येथील बाळकृष्ण महाराज फणसे मठ येथे आजी व माजी सैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  संवाद साधताना ते बोलत होते.यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुनिल गोडबोले, कर्नल मनीष भोला, मेजर आर्यविंदर सिंह अहलुवालीया, पोलीस निरिक्षक प्रशांत भस्मे आदी उपस्थित होते.



         देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी सैनिक नेहमीच कर्तव्यदक्ष असतात. देशाची सेवा करुन आलेल्या माजी सैनिकांना सर्वसामान्य नागरी जीवनात येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी  तसेच त्यांच्यावर अवलबिंतांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी लष्कर  तसेच शासनाच्या मदतीने तात्काळ कार्यवाही करुन प्रलंबीत प्रश्न  सोडविले जातील. तसेच माजी सैनिकांनी आपल्या आरोग्याची वेळोवेळी तपासणी करुन घ्यावी, आपले आरोग्य चांगले रहावे यासाठी संतुलीत आहार ,व्यायाम व योगा करावा  असे  कमांडिंग  ऑफिसर रसेल डिसुझा यांनी सांगितले.
        यावेळी जिल्हा सौनिक कल्याण अधिकारी सुनिल गोडबोले  म्हणाले, माजी सैनिक तसेच त्यांच्यावर अवलबिंतांचे प्रश्न सोडविण्यासाठी सैनिक कल्याण विभागास आवश्यक असलेल्या कागदपत्राची पुर्तता करावी जेणे करुन आपले प्रश्न तात्काळ मार्गी लागतील.  महानगरपालिका, नगरपालिका  यांच्या हद्दीतील कर सवलतीसाठी एकच प्रॉपर्टी नोंदवावी, दुसऱ्या मिळकतीस कर सवलतीचे  लाभ मिळणार नाहीत. तसेच अडचणी बाबत सैनिक कल्याण विभागांच्या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
यावेळी मेळाव्यात माजी सैनिकांच्या  , पेन्शन संबधी तक्रारीचे  निवारण, जमीनी, बँक कर्ज पोलीस,  भुसंपादन प्रकरणे, आदी विभागाशी निगडीत समस्यांचे निराकरण करण्यासाठी विविध स्टॉल उभारण्यात आले होते. माजी सैनिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात  आली. मेळाव्यास माजी सैनिक, वीर  पत्नी, वीर माता, वीर पिता उपस्थित होते.  यावेळी  वीर हुतात्मा मेजर कुणाल गोसावी यांच्या आई-वडील तसेच परिसरातील वीर माता यांचा सत्कार डेप्युटी कमांडिंग  ऑफिसर रसेल डिसुझा यांच्या हस्ते करण्यात आला.

    
















महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments