अक्षय मोरे यांचा सन्मानपत्र देवून गौरव

पंढरपूर LIVE 25 नोव्हेंबर 2018


शहीद जवानांच्या स्मरणार्थ उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय पंढरपूर व पंढरपूर ब्लड बॅंक यांच्या संयुक्त विद्यमाने दि.25 नोव्हेंबर 2018 रोजी पंढरपूर येथील पंढरपूर शहर पोलिस स्टेशन येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये आजपर्यंत 75 वेळा रक्तदान करून समाजासमोर आदर्श ठेवणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील मुंढेवाडी येथील अक्षय सुखदेव मोरे यांचा सन्मानपत्र, व सन्मानचिन्ह न्यायाधीश बावीसकर साहेब व उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सागर कवडे यांच्याहस्ते देवून गौरविण्यात आले.
आजपर्यंत अक्षय मोरे यांनी वेगवेगळ्या शिबीरांमध्ये रक्तदान केले असून आपण केलेले रक्तदान एखाद्याचा जीव वाचवू शकतो या हेतूने ते अनेकांना रक्तदान करण्यासाठी प्रेरणादायी कार्य करीत असतात. आजपर्यंत त्यांनी 25 कॅम्प मुंढेवाडी येथे रक्तदान शिबीरे भरविण्यात आलेली आहेत. मोरे यांनी सन 2000 साली राज्यातील सर्व किल्ले सायकलवर फिरले आहेत. अशा प्रकारे समाजासमोर आदर्श ठेवणाऱ्या अक्षय मोरे यांचे सर्वांकडून कौतुक केले जात आहे.


    
















महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments