पंढरपूर: राष्ट्रीय लोकअदालतीत 39 प्रकरणे निकाली ... 12 लाख 84 हजार 702 रुपयांवर तडजोड

पंढरपूर LIVE 8 डिसेंबर 2018




           पंढरपूर, दि-08-  राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये  दिवाणी, फौजदारी व मोटार अपघात दावे यांचे प्रलंबीत 203 प्रकरणे तसेच दाखल पुर्व 823 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 39 प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली असून, याप्रकरणामध्ये एकूण 12 लाख 84 हजार 702 रुपयांची  तडजोड झाली असल्याची माहिती  तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश अ.ज. पाटंगणकर यांनी दिली.
तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष्‍ तथा जिल्हा न्यायाधीश अ.ज. पाटंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज शनिवार दिनांक 08 डिसेंबर 2018 रोजी  राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
या  लोकअदालतीसाठी एकूण तीन पॅनल तयार करण्यात आले होते. या पॅनल मध्ये जिल्हा न्यायाधीश-2 एन.पी. कापुरे, सह. दिवाणी न्यायाधिश एस.जी.सरोदे, सह.दिवाणी न्यायाधीश डी.यु.रजपूत यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले. यावेळी दिवाणी न्यायाधीश  एस.एस.आरदवाड, न्यायदंडाधिकारी एस.टी. शिंदे  यांच्यासह न्यायालयीन कर्मचारी व पक्षकार उपस्थित होते.








महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments