पंढरपूर LIVE 9 डिसेंबर 2018
पंढरपूर शहर व तालुका रिपाइं ने दिलेे डीवायएसपी डॉ. सागर कवडे यांना निवेदन
पंढरपूर (प्रतिनिधी):- शनिवार दि. 8 डिसेंबर 2018 रोजी अंबरनाथ, जि. ठाणे (मुंबई) येथे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री व रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ना. रामदासजी आठवलेसाो यांच्यावर भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न करणार्या गुन्हेगारावर कडक कारवाई करावी व सदर व्यक्तीला कोणाचे पाठबळ आहे हे शोधावे. अशी मागणी आज दि. 9 डिसेंबर 2018 रोजी पंढरपूर शहर व तालुका रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया यांच्यावतीने करण्यात आली. या मागणीसंदर्भाचे निवेदन पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे यांना देण्यात आले.
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री व रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ना. रामदासजी आठवलेसाो यांची वरील ठिकाणी सभा होती. ही सभा संपवुन ते स्टेजवरुन खाली उतरत असताना एका व्यक्तीने त्यांना धक्काबुक्की करुन भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ही बाब पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने निंदणीय आहे. जर अशा नेत्यावर हल्ला होत असेल तर आपली पोलीस यंत्रणा काय करीत आहे? पुढील काळात अशा प्रवृत्तींना धडा शिकविण्यासाठी पोलिसांनी त्यांचा चोख बंदोबस्त ठेवावा. यापुढे अशा गोष्टी व निंदणीय प्रकार होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. व सदर गुन्हेगारावर कडक कार्यवाही करावी अशी मागणी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया पंढरपूर शहर तालुका व युवक आघाडी यांनी निवेदनाद्वारे केली असुन सदर निंदणीय भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.
यावेळी सुनील सर्वगोड, बाळासाहेब कसबे, जितेंद्र बनसोडे, संतोष पवार, अर्जुन मागाडे, कुमार भोसले, संतोष सर्वगोड, कैलास कांबळे, समाधान लोखंडे, दयानंद बाबर, संजय शिवशरण, विजय वाघमारे, सचिन भडकवाड, सचिन भोसले, अमीत कसबे, अरविंद कांबळे, उमेश सर्वगोड, लक्ष्मण कांबळे, नितीन गाडे, महादेव भालेराव आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com






0 Comments