ग्रंथालयास पुस्तके भेट देऊन शहीद कुणाल गोसावी यांना आदरांजली

पंढरपूर LIVE 30 नोव्हेंबर 2018


पंढरपूर (प्रतिनिधी) :- शहीद मेजर कुणाल गोसावी यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त शहीद मेजर कुणाल गोसावी यांनी भारतमातेसाठी दिलेल्या बलिदानाचे व केलेल्या पराक्रमाचे स्मरण पुढच्या पिढ्यांना होत राहावे म्हणून विविध संस्था आणि संघटनांच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

          

याच सामाजिक  भावनेतून शहीद कुणाल गोसावी यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त येथील विश्वविक्रमवीर कवी रवि वसंत सोनार आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सविता रवि सोनार यांनी भावी पिढीला ग्रंथालयांच्या माध्यमातून जास्तीत जास्त पुस्तके वाचून अधिकाधिक ज्ञान प्राप्त करून घेता यावे यासाठी पंढरपूर येथील सावरकर मुक्तद्वार वाचनालयास सावन माझा - दत्तू ठोकळे, विचारांच्या धुंदीत - सौ. प्रज्ञा करंदीकर, दाटून येता हे काळोखी काहूर - शांताराम हिवराळे, अरुणिमा - सौ चंद्रलेखा बेलसरे, काव्यलहरी - शकुंतला देव, रे मना - मनीषा वाणी, अस्तित्व - शांताराम डफळ, अनुभूती - सौ चंद्रलेखा बेलसरे, सजवलेले क्षण - प्रल्हाद दुधाळ, प्रांजळ - रविंद्र कामठे, अंधारडोह - शांताराम हिवराळे, माझी कविता - सरिता कमळापुरकर, शेतीबाडी - माधव गिर, स्वप्नसखा - कस्तुरी देवरुखकर आणि शब्दमाला - जयंत वाघ ही महाराष्ट्रातील मान्यवर  साहित्यिकांची वैविध्यपूर्ण विषयांची पुस्तके भेट देऊन शहीद मेजर कुणाल गोसावी यांना आदरांजली वाहिली.
          
    

याप्रसंगी सावरकर मुक्तद्वार वाचनालय येथे शहीद मेजर कुणाल गोसावी यांच्या प्रतिमेला वंदन करण्यात आले. तद्नंतर सोनार दाम्पत्यांनी सावरकर मुक्तद्वार वाचनालयाचे ग्रंथपाल श्री. संतोष भोसेकर आणी कर्मचारी श्री. सचिन चुंबळकर यांच्याकडे महाराष्ट्रातील मान्यवर साहित्यिकांच्या वैविध्यपूर्ण पुस्तकांचा संच सुपूर्द केला. यावेळी सावरकर मुक्तद्वार वाचनालयाचे सभासद तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेचे अभ्यासक विद्यार्थी उपस्थित होते













महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments