कासेगाव येथील सिद्धनाथ विद्यालयात बझार डे

पंढरपूर LIVE 1 डिसेंबर 2018











खर्डी प्रतिनिधी: संतोष कांबळे 

श्री सिद्धनाथ विद्यालय, सातवा मैल, कासेगाव येथे बझार डे चे आयोजन करण्यात आले होते.
 या उपक्रमाचे मूळ उद्दिष्ट मुलांना सामाजिक अनुभव यावेत, व्यावहारिक ज्ञान मिळावे व चलन लक्षात यावे तसेच नफा-तोटा खरेदी-विक्री कळावी हे होते. 

यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक जयंत अयाचित व त्यांच्या सर्व स्टाफ ने या उपक्रमाचे योग्य नियोजन केले होते. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या शेतात पिकलेला शेतमाल व वेगवेगळया वस्तू या बाजार डे मध्ये विक्रीसाठी आणल्या होत्या.  आसपासच्या ग्रामस्थांनी व पालकांनी या अनोख्या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.

यावेळी प्रशालेचे सहशिक्षक शिवाजी शिंदे, सिकंदर पटेल , सदाशिव मोठे, परमेश्वर झांबरे, अजय पवार सौ.स्वप्नाली जगताप, भारत मासाळ, मीनानाथ खताळ आदि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 


    








महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments