पंढरपूर तालुक्यातील जप्त केलेल्या अवैध वाळु साठ्याचा बुधवारी होणार लिलाव... प्रांताधिकारी ढोले यांची माहिती

पंढरपूर LIVE 1 डिसेंबर 2018



           पंढरपूर, दि. 01 :- तालुक्यात जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्याचा लिलाव बुधवार दिनांक 05 डिसेंबर 2018रोजी दुपारी 12.00 वाजता  उपविभागीय अधिकारी  कार्यालय, पंढरपूर येथे आयोजित केला असल्याची माहितीउपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
            तालुक्यात महसूल प्रशासनाने अवैध वाळू साठे व वाळू वाहतुकीवर केलेल्या कारवाईत सुमारे  200.96 ब्रास वाळू जप्त केली असून, हा वाळू  साठा शासकीय धान्य गोदाम, पंढरपूर येथील  आवारात  ठेवण्यात आला आहे. या  ठिकाणच्या वाळू साठ्याची किंमत सुमारे 14  लाख 6 हजार  720 रुपये  इतकी आहे. ज्या कोणास वाळू लिलावात भाग घ्यावावयाचा अशा व्यक्तींनी  संबधीत ठिकाणच्या वाळू साठ्याची पाहणी करावी. तसेच लिलावात भाग घेण्यासाठी  दिनांक 04 डिसेंबर 2018 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत  लेखी अर्ज उपविभागीय अधिकारी पंढरपूर विभाग पंढरपूर यांच्याकडे सादर करावेत असेही उपविभागीय अधिकारी ढोले यांनी सांगितले.
            सदर लिलावात सर्वोत्तम बोलीची रक्कम लावलेल्या  लिलावधारकाने  संपूर्ण रक्कम तात्काळ त्याच दिवशी शासकीय खजिन्यात चलनाव्दारे जमा करावी. लिलावधारकाने लिलावाची रक्कम भरल्यानंतर स्वत:कडील वाहनाव्दारे संबधीत ठिकाणावरुन वाळू घेवून जावी. लिलावात भाग घेण्या-या व्यक्तींनी नमुद ठिकाणी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहनही उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे. 


    







महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments