

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- रासायनिक खतांच्या मार्यातुन शरिराला घात ठरत असलेल्या धान्यानपासुन सुटका होण्याच्या दृष्टीने नैसर्गीक शेती हा प्रर्याय यशस्वी होतांना दिसत आहे. अशा प्रकारचा यशस्वी प्रयोग नंदनज येथील विश्वांभर गुट्टे या शेतकर्याने करुन दाखविला आहे. अगदी झिरो बजेट शेतीतुन ऊस पिक घेत या पिकातुन अंतरपिकाचेही दुहेरी उत्पन्न काढत दुष्काळी परिस्थतीत इतर शेतकर्यांना आदर्श घालून दिला आहे. एवढेच नाहीतर या नैसर्गीक शेतीतुन विषमुक्त गुळ व पाक (काकवी) ग्राहकांच्या मोठ्या पसंतीला उतरल्याचे दिसुन येत आहे.

परळी तालुक्यातील नंदनज येथील शेतकरी विश्वांभर गुट्टे यांनी आपल्या शेतात 5 एकर ऊसाची लागवड केली. त्याचे वडील विठ्ठलराव गुट्टे भाऊ हनुमंत गुट्टे हे सर्व कुटुंबिय अतिश निष्टने शेती करतात. हा ऊस कोणत्याही कारखान्याला देण्याऐवजी त्यांनी पारंपरिक पध्दतीने स्वतःच या ऊसाचे गुळनिर्मिती करण्यासाठी आपल्या शेतातच गुर्हाळ सुरु केले आहे. या माध्यातुन शंभर टक्के नैसर्गिक पध्दतीने घेण्यात आलेल्या पिकांपासुन विषमुक्त गुळ व काकवी निर्माण केली जात आहे. या गुळाला प्रचंड मागणी असुन या शेतकर्यांने बाजारपेठेत व्यापार्यांना गुळविक्री करण्याऐवजी शेतकरी ते थेट ग्राहक ही संकल्पनाही यशस्वी करुन दाखविली आहे. गेल्या 16 वर्षापासुन परळी परिसरात ऊसाचे गुर्हाळ लावणारे शेतकरी म्हणुन ते प्रसिध्द आहेत.
0 Comments