मोदींनी मिडीया विकत घेतलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
फायदा आणि तोटा निवडणुकीमध्ये आम्ही बघत नाही, जनता हुशार झाली आहे. तरुण पिढीमध्ये भावी नेतृत्व आहे, त्यांनी वरवरच्या वक्तव्याला भुलू नये, तरुणांच्या हातामध्ये संपुर्ण देश जायचा आहे. तरुण वर्गाला त्यांनी विनंती केली की, आपण व्यक्त होताना देशाला स्वातंत्र्य कुणी मिळवून दिलं, देशाची डेव्हलपमेंट कुणी केली याचा विचार करावा, कारण तरुण मंडळी गेल्या 25 वर्षाचाच विचार करतात, 25 वर्षापुर्वी काय घडलं हे त्यांना माहिती नाहीय. त्यामुळे तरुणांनी सर्व डिटेल्स माहिती घ्यावी अशी विनंती त्यांनी तरुण पिढीला केली.
''एकदा एखादी कमिटमेंट केल्यानंतर ती पुर्ण केली पाहिजे या मताचा मी आहे. सर्व धर्मांना समान मानुन सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा काँग्रेस हा पक्ष आहे. आणि आमचा विजय निश्चित आहे. असा विश्वास त्यांनी या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.''
0 Comments