माढा लोकसभा निवडणुकीसाठी आज दुपारी 5 वाजेपर्यंत एकुण 56.37 टक्के एवढे मतदान झाले. आज 5 वाजेपर्यंत करमाळा- 56.43%, माढा-60.11%, सांगोला-55.18%, माळशिरस-57.39%, फलटण-56.69, माण-52.47% मतदार बंधु-भगिणींनी आपला मतदानाचा हक्क बजावला. माढा तालुक्यातून सर्वाधिक म्हणजे 60.11% मतदारांनी मतदान केले. माढा मतदार संघाच्या आजच्या निवडणुकीत 5 वाजेपर्यंत पुरुष मतदान एकुण- 57.86%, महिला मतदान एकुण- 54.73% तर इतर 25% टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला.
एकुण मतदान 60 ते 65 टक्केपर्यंत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महाराष्ट्रामधील सर्वात लक्षवेधी असणार्या या मतदार संघातून कोण विजयी होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागुन आहे. भाजपा व राष्ट्रवादी या दोन्ही राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींनी ही निवडणुक प्रतिष्ठेची मानुन दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आपली संपुर्ण शक्ती पणाला लावलेली आहे.

0 Comments