पुणे दि. 23 : पुणे विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी कुटूंबियांसह अल्पबचत भवन येथे मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी डॉ.दीपक म्हैसेकर यांच्यासह त्यांच्या पत्नी रोहिणी म्हैसेकर व मुलगा अथर्व म्हैसेकर यांनीही मतदानाचा हक्क बजावला. डॉ.म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागात मतदान शांततेत आणि सुरळीत सुरु आहे. अन्य लोकसभा मतदार संघांबरोबरच पुण्यातील मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी घराबाहेर पडून नि:पक्षपातीपणे मतदान करून मतदानाचे कर्तव्य बजावावे.
0 Comments