पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता पंढरपूर) येथील एस के एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या प्रधानमंत्री कौशल विकास योजनेतील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आली.
प्रधानमंञी कौशल्य विकास योजना हि देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना शासन राबवित असुन युवकांच्या कौशल्य प्रशिक्षणासाठी एक मुख्य योजना आहे. पंढरपुर परिसरातील विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत शिक्षण मिळावे यासाठी सिंहगड इन्स्टिट्यूट कोर्टी-पंढरपुर मध्ये “प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा” शुभारंभ करण्यात आला असुन इच्छुक विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महाविद्यालयाकडून करण्यात आले आहे.

महाविद्यालयात प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना "प्लबंर जनरल" या कोर्सचा कालावधी तीन महिने असुन पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात या कोर्सेचे मोफत शिक्षण देण्यात येत आहे. या कोर्सेस साठी प्रा. दिग्विजय जगताप, प्रा. महेश शिंदे, प्रा. गणेश लकडे, प्रा. मुरलीधर कुलकर्णी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. या कोर्समुळे तांत्रिक ज्ञान विद्यार्थ्यांना मिळत असुन यामुळे विविध क्षेत्रात नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतात. व्यवसायासाठी बँकेकडून कर्ज मिळण्यास मदत होते. हा कोर्स संपूर्णपणे विनामूल्य आहे. चालु वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. चेतन पिसे म्हणाले, विद्यार्थ्यांना प्रधानमंञी कौशल्य विकास योजनेअंतर्गत आमच्या महाविद्यालयात असलेल्या विविध कोर्सेस मध्ये विद्यार्थ्यांनी नोंदणी करून घ्यावी. हे कोर्सेस विद्यार्थ्यांना मोफत शिकविले जाणार असुन या कोर्सेस मधुन विद्यार्थ्यांना व्यवसाय व नोकरी मिळविण्यासाठी फायदा होईल असे मत डॉ. पिसे यांनी व्यक्त केले. उपस्थित विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिव्हिल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डाॅ. चेतन पिसे, डाॅ. सचिन सोनवणे, प्रा. श्रीनिवास कदम, प्रा. चंद्रकांत देशमुख आदी सह महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. यशवंत पवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. दिग्विजय जगताप सर यांनी मानले.

0 Comments