महेंद्र कदम, प्रेमनाथ रामदासी, श्रीकांत पाटील,शशिकांत जाधव व रमेश वारके मानकरी
पंढरपूर/प्रतिनिधी
अक्षरज्योत पब्लिकेशन पंढरपूर व महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती यांच्यावतीने दिले जाणारे साहित्य पुरस्कार नुकतेच जाहीर झाले असुन ५ मे रोजी दुपारी १२ वाजता विठ्ठल रुक्मिणी पॅलेस पंढरपूर येथे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

डॉ.महेंद्र कदम (तू जाऊन तीन तपं झाली), प्रेमनाथ रामदासी(अंतपर्व), प्रा.शशिकांत जाधव (दुखितांचे अश्रु), डॉ.श्रीकांत पाटील( लिहू आनंदे ) रमेश वारके (माणूस शोधतो मी) हे यावर्षीच्या साहित्य पुरस्काराचे मानकरी आहेत.
शाल,श्रीफळ,सन्मानचिन्ह, आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप असुन हा साहित्य विश्वातील एक प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. या पुरस्कार समितीमध्ये शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. राजेश पवार,लेखक अंकुश गाजरे,कवी गणेश गायकवाड यांनी काम पाहिले. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन अक्षरज्योत पब्लिकेशन व महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्यावतीने करण्यात येत आहे.


0 Comments