पंढरपूर:- भारतीय राज्यघटनेच्या स्वीकृतीपासून केवळ वंचित बहुजन समाजातील लोकांनी मतदानाचा अधिकार आणि राष्ट्रीय कर्तव्य बजावत प्रजासत्ताक लोकशाही प्रक्रिया बळकट केली आहे. इतर वर्ग आजही या प्रक्रियेकडे हीन भावनेतून पाहतात. त्यामध्ये सहभाग घेत नाहीत. लोकसभेच्या चालू निवडणुकांतील आकडेवारीवरून हे स्पष्ट होते. म्हणून वंचित बहुजन समाजच संविधानाचा खरा संरक्षक आहे असे प्रतिपादन फुले आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ कार्यकर्ते आणि रिपब्लिक होलार परिषदेचे अध्यक्ष एस. के. ऐवळे सर यांनी केले.

जयभीम तरुण मंडळ, अनवली आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव 2019 या कार्यक्रमातील व्याख्यानाच्या सत्रात प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सुनिल वाघमारे हे होते.
पुढे बोलताना एस. के. ऐवळे सर म्हणाले की, या प्रजासत्ताक लोकशाही प्रक्रियेचे चालक जर आपण असू तर लोकप्रतिनिधी सुद्धा आपणच म्हणजे वंचित बहुजन समाज असला पाहिजे. म्हणूनच बाबासाहेबांनी 'जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की, आम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचे आहे' असे म्हटले आहे. तेव्हा वंचित बहुजन समाजाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या राजकीय अस्मितेसाठी वाटेल ती किंमत मोजण्यास तयार असले पाहिजे असे ते म्हणाले.
यावेळी अनवली गावचे सरपंच संतोष खुणे, मा. उपसरपंच सिद्धनाथ भोसले, मा. उपसरपंच चांगदेव घोडके, ग्रामपंचाय सदस्य संजय पाटील, तंटामुक्त अध्यक्ष संजय माळी, मजूर सोसायटीचे दत्तात्रय सुर्यवंशी, माळी समाज नेते महादेव माळी, रुबाब चाचा मुलाणी, पंढरपूर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष पिंटू भोसले, सुरेश घोडके, सीताराम रणदिवे, बंडू गोसावी, प्रगतशील बागायतदार गणपत आसबे, संतोष रणदिवे, नितीन भोसले, सत्यवान भोसले, राजू भंडारे, प्रा. धैर्यशील भंडारे यांचेसह जयभीम तरुण मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक सचिन भंडारे यांनी केले. सूत्रसंचालन दिक्षा कांबळे हिने केले तर आभार जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष समाधान भंडारे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष वैभव भंडारे, सचिव अमित भंडारे, खजिनदार संदेश शिंदे, विक्रमशील वाघमारे यांनी परिश्रम घेतले.



0 Comments