
पंढरपूर – आज शनिवार (२७ एप्रिल) ‘जागतिक पशुवैद्यक दिना’निमित्त गोपाळपूर (ता, पंढरपूर )येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनीअरींगमध्ये तांत्रिक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
आज शनिवार (दि. २७ एप्रिल) रोजी सकाळी ९.३० वाजता ‘जागतिक पशुवैद्यक दिना’निमित्त श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनीअरींगमध्ये सहआयुक्त पशु संवर्धन तथा पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. महेश बनसोडे यांचे ‘भविष्य काळातील पशुवैद्यकांपुढील आव्हाने’ या विषयावर तांत्रिक परिसंवादाचे आयोजन केले आहे.

तसेच यावेळी स्व. सुहास देशपांडे उत्कृष्ठ पशुवैद्यक पुरुस्काराचे वितरण होणार आहे. याप्रसंगी सोलापूरचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.एन.ए.सोनवणे, साताऱ्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. चंद्रशेखर देवेज्ञ आणि स्वेरीचे जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. या परिसंवादासाठी जिल्ह्यातील सहायक आयुक्त, पशुधन विकास अधिकारी उपस्थित राहणार असून क्षेत्रीय पातळीवर कामे करताना पशु पालकांच्या व पशु वैद्यकांच्या समस्यांचा उहापोह, चर्चा व निराकरण यासंबंधी तज्ञांकडून मार्गदर्शन होणार आहे. अशी माहिती सहा.आयुक्त दिनकर बोर्डे, जेष्ठ पशुवैद्यक प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.विश्वासराव मोरे, तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. चंद्रकांत निंबाळकर व सचिव अनिलकुमार सरदेशमुख यांनी दिली.

0 Comments