आढीव प्रतिनिधी-- आढीव ता पंढरपूर येथील जि.प.प्रा शळोने मुलांना रोजच्या जेवणापेक्षा वेगळे व आवडणारे पदार्थ असे भोजन देवून या शैक्षणिक वर्षाला निरोप द्यावा अशी संकल्पना शाळेचे मुख्याध्यापक श्री.मारूती शिरगुर सर यांनी मांडली
वर्षभरातील अभ्यास शिष्यवृत्ती परिक्षा,क्रीडा स्पर्धा,विविध नाविन्यपूर्ण उपक्रम,वार्षिक शैक्षणिक मुलांचा थकवा घालवण्यासाठी मुलांना रोजच्या जेवणापेक्षा वेगळे व आवडणारे पदार्थ असे भोजन देवून.याच बरोबर तालुस्तरीय क्रीडा स्पर्धेत लहान गट मुले व लहान गट मुली यांना पंचायत समिती शिक्षण विभाग पंढरपूर,यांच्याकडून मिळालेली ढाल व प्रशस्तीपत्रक देवून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. त्याचबरोबर इयत्ता सातवी मध्ये शिकत असलेली मुला - मुलींचा हि सत्कार करण्यात आला. व पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा देवून तिचा निरोप समारंभ करण्यात आला.

व रोजच्या दिनक्रमातून शाळेत भोजनाचा वेगळा अनुभव घेताना मुला मुलींची व बालगोपलांच्या चेहऱ्यावर आनंद,उत्साह दिसत होता.त्यांचा आनंद व जेवणा विषयीच्या मुलांच्या प्रतिक्रिया ऐकून सर्व शिक्षकाच्या व सर्व सदस्य,शिक्षणप्रेमी यच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते . यासाठी सर्व शिक्षकवर्ग अंगणवाडी शिक्षिका,शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिला व शा.व्य.समिती . ग्रामस्थ , यांचे सहकार्य लाभले या प्रसंगी बाभूळगाव केंद्राचे क्रेंद्रप्रमुख नामदेव भोसले , शा.व्य.स.अध्यक्ष .सुरेश चव्हाण,उपाध्यक्ष वासुदेव पाटील,तसेच सर्व सदस्य,शिक्षणप्रेमी,शा.व्य.स.माजी अध्यक्ष श्री.नितीन चव्हाण, व भैरवनाथ विद्यालय आढीव आदीसही शिक्षक उपस्थित होते.

0 Comments