पुष्पा फौंडेशन या संस्थेच्या सामाजिक जागृति मोहीम अंतर्गत लोणीकाळभोर गावात कॉम्प्युटर प्रशिक्षण शिबिराचे नियोजन करण्यात आले आहे. "पुष्पा फाउंडेशन हि Non Profit संस्था (Reg.) आहे आणि हि संस्था शिक्षण सहाय्य, महिला सशक्तीकरण, मुलींचे शिक्षण आणि अश्या कामांसाठी कार्यरत आहे. आजच्या वाढत्या तांत्रिक जगामध्ये, संगणक शिक्षण ही काळाची गरज आहे. गरजू विद्यार्थ्यांपर्यन्त मोफ़त संगणक शिक्षण पोहचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. संगणक शिक्षण गरजू विद्यार्थ्यांपर्यन्त पोहचवणे व त्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे हाच संस्थेचा प्रमुख उद्देश आहे." असे प्रतिपादन संस्थेचे कार्यकर्त्या सोनाली चव्हाण यांनी केले.

या प्रशिक्षण शिबिरात जास्तीत जास्त विद्यार्थी आणि विध्यर्थीनी यांनी सहभागी व्हावे असेही त्यांनी विनंती केली. रविवार दि. २८/०४/२०१९ ला सुरू होणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे अध्यक्ष शिव मल्हार टूर्स अँड ट्रॅव्हल्स चे संस्थपक श्री.धनंजय जाधव असणार आहेत. "आधुनिक जीवनात संगणक खूप महत्वाचे आहे. आमच्या दैनिक जीवनात हार्डवेअर, सॉफ्टवेअर, इंटरनेट, Google इ. ची माहिती खूप महत्वाची आहे." असेही धनंजय जाधव यांनी सांगितले. या प्रसंगी संस्थेचे मुख्य कार्यकर्ते, पदाधिकारी अक्षय चव्हाण ओंकार गायकवाड उमेश गायकवाड, विशाल जाधव, विनायक पाटील, जयंत गायकवाड, .गणेश गायकवाड, वैशाली डफळे उपस्थित असणार आहेत. स्थळ : Marigold इंटरनॅशन स्कूल, कदमवाक वस्ती, रायलकर हॉस्पिटल जवळ, गेट नंबर २६०. लोणीकाळभोरं, पुणे- ४१२२०१ दिनांक : २८/०४/२०१९ वेळ :सकाळी ९ वा. देणगी, Ac name -Pushpa Foundation Ac number -50100268794539 Ifsc code -HDFC0000486 Hdfc bank Magarpatta Branch तुम्ही दिलेली आर्थिक मदत बहुमूल्य आहे. अधिक माहिती आणि कार्यक्रम sponser करण्यासाठी साठी संपर्क : 9860421216
0 Comments