पंढरपूर तालुक्यातील काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. वाडी कुरोली (ता. पंढरपूर) येथील सभेत काळे यांनी प्रवेश केला. कल्याणराव काळे यांच्या भाजपा प्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. काळे यांच्या भाजपा प्रवेशामुळे पंढरपूर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे पारडे जड झाले आहे तसेच माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारांना याचा फायदा होणार आहे.
कल्याणराव काळे यांचे दोन साखर कारखाने आहेत. युतीच्या काळातच त्यांनी पहिला साखर कारखाना उभारला होता. कल्याणराव काळे यांचे वडील वसंतराव काळे हे पूर्वी शिवसेनेत होते. मात्र, त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले होते. आता कल्याणराव काळे पुन्हा काँग्रेसमधून भाजपात आले आहेत.

यावेळी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, सुभाष देशमुख, सुधाकरपंत परिचारक, रणजित नाईक निंबाळकर, शहाजी बापू पाटील, प्रशांत परिचारक, रणजितसिंह मोहिते पाटील, बी.पी. रोंगे (सर), धनाजी साठे, शिवाजीराव सावंत, विजय चौगुले आदी नेते उपस्थित होते.
-------------------------------------------------------
पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर Live "
तब्बल 39 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या
पंढरपूर Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, जि. सोलापूर 413304
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whats Up - 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Mail- livepandharpur@gmail.com
0 Comments