स्वेरीतील प्राध्यापकाना संशोधनाबाबत मार्गदर्शन संपन्न
पंढरपूर- ‘ज्ञानदान हा एक उदात्त व्यवसाय असून स्वेरीचे सर्व शिक्षक यासाठी परिश्रम घेवून सुंदर कार्य करत आहेत. स्वेरीमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची नवनवीन दालने उपलब्ध करून दिली जात असताना प्रत्त्येकानी बदलत्या तंत्रज्ञानाची गती आत्मसात करण्याची गरज आहे. एन.के. एन व आर.एच.आर.डी. एफ. हे उपक्रम अतिशय उत्कृष्ठपणे स्वेरीतून राबविले जात आहेत. याचबरोबर संशोधनाच्या माध्यमातून स्वेरीने उद्योजक देखील तयार करण्याचे कार्य केले आहे. ही बाब निश्चित कौतुकास्पद आहे. ‘असे प्रतिपादन भारत सरकारच्या सचिवा व फायनान्स,अॅटॉमिक एनर्जी आणि स्पेस कमिशनच्या सदस्या डॉ. सुधा कृष्णन यांनी केले.
भारत सरकारच्या सचिवा व फायनान्स, अॅटॉमिक एनर्जी आणि स्पेस कमिशनच्या सदस्या डॉ. सुधा कृष्णन आणि अधिकारी वर्ग स्वेरीमध्ये सुरु असलेल्या बी.ए.आर.सी. चे डी.ए.ई. आऊटरिच सेंटर, आर,एच.आर. डी. एफ या संशोधन केंद्राची पाहणी करण्यासाठी आले असताना स्वेरीतील संशोधक व प्राध्यापकाना मार्गदर्शन करत होत्या. प्रारंभी संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी स्वेरीत सुरु असलेल्या सर्व उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. प्रारंभी भाभा अनु संशोधन केंद्र अंतर्गत असलेल्या आकृती सेन्टरच्या प्रमुख डॉ. स्मिता मुळे यांनी आकृतीचे स्वरूप सांगून सचिवा डॉ. कृष्णन व इतर पाहुण्यांचा परिचय करून दिला. केंद्र सरकारच्या स्कील इंडियाचे सचिव डॉ. के.पी.कृष्णन म्हणाले की, ‘भारतामध्ये आय.टी.आय.च्या माध्यमातून प्रत्येक वर्षी २५ लाख कौशल्य कामगार निर्माण होतात परंतु प्रत्येक वर्षी अडीच कोटी कौशल्य कामगारांची गरज आहे. सध्याच्या शिक्षणात ‘दर्जा आणि रोजगार क्षमता’ या प्रमुख अडचणी आहेत, परंतु स्वेरीमध्ये या दोन्ही गोष्टींवर उत्कृष्टपणे कार्य केले जात आहे याचे समाधान आहे.’ डॉ. अजय शहा म्हणाले की. ‘माणसांनी नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी सतत बदल स्विकारले पाहिजे व बदलत राहिले पाहिजे. यासाठी शिक्षकांनी ज्ञानदान करताना २० वर्षातील तरुणांप्रमाणे उत्साहात काम केले पाहिजे. तसेच विद्यार्थी व शिक्षकांनी नवनवीन क्षेत्रांना सामोरे गेले पाहिजे.’ असे सांगून आकृती, कृती आणि फोर्स म्हणजे नेमके काय? याची माहिती देवून स्वेरीतील उपक्रमांचे कौतुक केले. यावेळी स्कील डेव्हलपमेंटचे उपसंचालक एस. बी. अंगणे, स्वेरीतील चारही महाविद्यालयातील अधिष्ठाता, संशोधन अधिष्ठाता डॉ. संतोष साळुंखे, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग व प्रा. व्ही.एस. क्षीरसागर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. स्नेहल मोहिते यांनी केले तर आभार शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांनी केले.
0 Comments