पंढरपूर (प्रतिनिधी) सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयात महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असलेला शिवगणेश राजकुमार डोंबे हा विद्यार्थी यावर्षी चा मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात बेस्ट आऊट गोईंग स्टुडंट पुरस्काराचा मानकरी ठरला आहे.
या कार्यक्रमाची सुरवात मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. रवींद्र व्यवहारे, डॉ. शाय्म कुलकर्णी, डॉ. सचिन सोनावणे, प्रा. बालासाहेब गंधारे, प्रा. समीर कटेकर, राहुल हराळे, शिवगणेश डोंबे आदीच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमची सुरवात करण्यात आली. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने प्रत्येक वर्षी बेस्ट आउटगोइंग स्टुडंट पुरस्कार प्रत्येक विभागातून देण्यात येतो. यावर्षी मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातून शिवगणेश डोंबे हा विद्यार्थी बेस्ट आऊट गोईंग स्टुडंट पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. महाविद्यालयाच्यावतीने प्रा. समीर कटेकर यांच्या हस्ते शिव गणेश डोंबे यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी विभागातील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट कामाबद्दल प्रमाणपत्र व गुलाब देऊन गौरविण्यात आले.

दरम्यान महाविद्यालयातील मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉ. रवींद्र व्यवहारे व प्रा. समीर कटेकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या वेळी आपली कला सादर करून आनंद घेतला. काही विद्यार्थ्यांना मनोगत व्यक्त करून महाविद्यालयाविषयी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करून आठवणीना उजळा दिला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय नवले व वैभव कोळवले यांनी केले तर उपस्थितांचे आभार आदित्य लाले यांनी मानले.
0 Comments