अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेच्या वतीने लोकसभा निवडणूकीच्या अनूषंगाने लोकशाही बळकट होण्याकरीता जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावावा यासाठी नागरीकांमध्ये मतदार जनजागृती अभियान नुकतेच राबविण्यात आले होते.
१००%मतदान , जनजागृती तसेच नोटाचा विकल्प टाळून लोकांनी जास्तीत जास्त मतदान करावे यासाठी पंढरपूर मधील अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेच्या वतीने व्दारसभा , पथनाट्य आदी उपक्रम सुरु आहेत . यापूर्वी शहरातील स्टेशन रोड , यमाई-तुकाई ट्रॅक , एस.टी.स्टॅंड येथे पत्रक वाटून जनजागृती केली यावेळी शहर कार्यकारणीमधील प्रणव बाडगंडी , आनंद भूसनर , स्वराज नाझरकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते .

0 Comments